‘दयाबेन’ झाली आई – eNavakal
मनोरंजन मुंबई

‘दयाबेन’ झाली आई

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील दया भाभीच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री दिशा वाकाणीने तिच्या चाहत्यांना गुड न्युज दिली आहे. दिशाने गोंडस परीला जन्म दिला आहे. 30 नोव्हेंबर रोजी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दिशाने मुलीला जन्म दिला आहे.ऑक्टोबर महिन्यात मुंबईत दिशाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. दिशाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.एवढेच नव्हे तर तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील तिचा ऑनस्क्रीन मुलगा टप्पू देखील या कार्यक्रमासाठी आर्वजून आला होता. या मालिकेत भाव्या गांधीने टप्पूची भूमिका साकारली होती. आज भाव्या या मालिकेत नसला तरी त्याचे दिशासोबतचे बाँडिंग कायम आहे.त्याने दिशाच्या  डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा एक क्यूटसा फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला होता.

दिशा खिचडी या मालिकेत अनेक छोट्या भूमिकांमध्ये झळकली होती. पण तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दया या भूमिकेने तिला प्रेक्षकांचे प्रचंड लोकप्रियता मिळाली.आता दया बेन पाठोपाठ दिव्यांका त्रिपाठीनेही गुड न्युज दिली आहे. ती प्रेग्नंट असल्याचे कळतंय.दिव्यांकाही लवकरच आई बनणार असल्याचं कळतंय.त्यामुळे दया बेन प्रमाणे इशी माँ म्हणजेच दिव्यांकाच्याही बाळाची उत्सुकता पाहायला मिळत आहे. तुर्तास दयाबेनने दिलेल्या आनंदाच्या बातमीमुळे तारक मेहता मालिकेच्या सेटवर आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.प्रत्येकजण दयाबेनवर शुभेच्छांचा वर्षाव करतोय.तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील सगळेच कलाकार मंडळी सध्या दिशा वाकानीची भेट घेत आहेत.आता दया बेन मालिकेत कधी परतणार याकडेही सा-यांचे लक्ष लागले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र मुंबई

मॉल पार्किंग मोफत देण्याचा कायदा आहे का? मुंबई हायकोर्टाचा पुणे पालिकेला सवाल

मुंबई – पुणेकरांना मॉलमध्ये पार्किंग शुल्क फ्री करण्याबाबत पालिकेचा कायदा आहे का? असा सवाल उच्च न्यायालयाने आज उपस्थित केला. पार्किंगचे शुल्क वसूल करण्यास मनाई...
Read More
post-image
News मुंबई

वर्सोवा ते लोखंडवाला रस्त्याच्या बांधकामात कांदळवनांचा बळी

मुंबई – मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वर्सोवा ते लोखंडवाला लिंक रोड एमएमआरडीएच्या वतीने बांधण्यात येणार आहे. परंतु या मार्गासाठी कांदळवनांचा बळी जाणार असल्याचा...
Read More
post-image
News मुंबई

पालिका प्रसूतीगृहांमध्ये बसवणार सीसीटिव्ही कॅमेरे

मुंबई – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई पालिकेने आपल्या रुग्णालय व प्रसूतीगृहांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयातून नवजात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईत सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकाचा मान ‘मुंबई सेंट्रल’ला मिळाला

मुंबई – मुंबई शहरातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक म्हणून ‘मुंबई सेंट्रल’चे नाव समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यवरणपूरकतेच्या तब्बल 12 कसोट्यांवर पात्र ठरल्याने मुंबई सेंट्रल...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुरामुळे साखर महाग झाली दुसर्‍यांदा दरवाढ! 40 रुपये किलो

कोल्हापूर – पूरस्थिती पूर्णपणे निवळत चालली असली तरी या कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराचा फटका साखरेला बसला आहे. साखरेचे भाव दुसर्‍यांदा वाढले आहेत. मागील आठवड्यात...
Read More