दक्षिण विभाग चॅम्पियन : आंतरविभागीय राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा – eNavakal
क्रीडा मुंबई

दक्षिण विभाग चॅम्पियन : आंतरविभागीय राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा

मुंबई – पूर्ण स्पर्धेत धमाकेदार खेळ दाखवणार्‍या यजमान पश्चिम विभागाच्या फलंदाजांना जेतेपदाच्या लढतीतच अपयशाला सामोरे जावे लागले. अंतिम सामन्यातील पश्चिम विभागाच्या फलंदाजांची निराशाजनक फलंदाजी  दक्षिण विभागाच्या पथ्यावर पडली. त्यांच्या नरेंदरच्या आक्रमक आणि सातत्यपूर्ण फलंदाजीने दक्षिण विभागाला आठव्या एलआयसी कप आंतरविभागीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावून दिले. दक्षिण विभागाने सहज विजयाची नोंद करताना पश्चिम विभागावर ६ विकेटनी मात केली.

दिव्यांग खेळाडूंसाठी स्फूर्तीदायक ठरलेल्या या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी जिगरबाज खेळ करून उपस्थितांची मनं जिंकली. नॅशनल क्रिकेट क्लबच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात दक्षिण विभागाने  पश्चिम विभागाच्या फलंदाजांना १२४ धावांत रोखूनच अर्धी लढाई जिंकली होती. त्यानंतर अर्धी लढाई नरेंदरने जिंकून दिली. काल एका सामन्यात ९९ धावांची जबरदस्त खेळी करणार्‍या नरेंदरने अंतिम सामन्यातही ३९ चेंडूंत ५४ धावांची अफलातून खेळी करीत संघाचे जेतेपद जवळजवळ निश्चित पेले. नरेंदरने सलग तीन ३० पेक्षा अधिक धावांच्या भागीदाऱया करून संघाला विजयासमीप नेले. नरेंदर१२ व्या षटकांत बाद झाल्यानंतर सुगणेशने अष्टपैलून चमक दाखवत १५ चेंडूंत नाबाद २९ धावा ठोकत संघाच्या विजेतेपदावरही शिक्कामोर्तब केले. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान दक्षिण विभागाच्या अष्टपैलू सुगणेशने मिळविला. स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज पश्चिम विभागाचा रोहन वाघेला तर दक्षिण विभागाचा फलंदाज नरेंदर ठरला. मध्य विभागाच्या मेहताब अलीला सर्वोत्कृष्ठ क्षेत्ररक्षकाच्या पुरस्काराने गौरविले.

त्याअगोदर  यजमान पश्चिम विभागाच्या फलंदाजांनी घोर निराशा केली होती. पश्चिम विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खरा पण सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर सुगणेशने मयुरेशचा त्रिफळा उडवून खळबळजनक सुरूवात केली. त्याननंतर सुगणेशने आपल्या पुढच्याच षटकांत तीन चेंडूंत कुणाल पटेल आणि सौरभ रवालियाला पायचीत करून पश्चिम विभागाची ३ बाद १३ अशी दुर्दशा केली. त्यानंतर असित जैसवारने कुणाल पानसेच्या साथीने आपल्या संघाची पडझड रोखली आणि संघाच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. दोघांनी ५१ धावांची भागी रचली. कुणाल २८ धावांवर पायचीत झाल्यानंतर सौरभने आणखी दोन छोट्या भागीदार्‍या करून संघाला ११८ धावांपर्यंत नेले. मात्र १८ व्या षटकांत सौरभच्या ६ चौकार आणि १ षटकाराचा झंझावात थांबताच त्यांचा डावही कोलमडायला फार वेळ लागला नाही. शेवटच्या दोन षटकांत त्यांना केवळ ६ धावांचीच भर घालता आली. प्रभावी गोलंदाजी करणार्‍या सुगणेशने १३ धावांत ३ बळी टिपण्याची करामात करून दाखवली.

दिव्यांग क्रिकेटपटूंची ही स्पर्धा दिमाखदार व्हावी म्हणून भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) मुख्य पुरस्कर्ते म्हणून पुढाकार घेतला होता तर  न्यू इंडिया ऍश्युरन्स, इंडियन ऑईल, जीआयसी, एचडीएफसी, युनियन बँक आणि सेंट्रल बँक यांनीही मोलाचे सहकार्य केले. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा अखिल भारतीय दिव्यांग क्रिकेट संघटनेचे आधारस्तंभ आणि माजी कर्णधार अजित वाडेकर, म़ाजी कसोटीपटू उमेश कुलकर्णी, मुंबई दिव्यांग क्रिकेट संघटनेचे सरचिटणीस विनायक  धोत्रे, कोषाध्यक्ष राजेश पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र राजकीय

बीडमध्ये काकांच्या कारभारावर पुतण्याचा बॅनरबाजीतून निशाणा

बीड- बीडच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच काका-पुतणे आमने-सामने उभे राहणार असल्याने त्यांच्यातील संघर्ष गल्लीबोळातही दिसू लागला आहे. राज्याचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विकासकामांवर त्यांचे पुतणे संदीप...
Read More
post-image
News देश राजकीय

काँग्रेससोबत युती नको, स्वतंत्र लढणार – देवेगौडा

बंगळुरू- कर्नाटकामध्ये मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर कोणासोबतही युती न करता स्वतंत्र लढण्यासाठी तयार राहू, असे माजी पंतप्रधान आणि जनता...
Read More
post-image
News महाराष्ट्र

उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा पूर्ववत

उरण- उरण ओएनजीसीच्या गॅस प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे गेल्या 10 दिवसांपासून बंद असलेला महानिर्मितीच्या उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा कालपासून पूर्ववत सुरू झाला आहे. यामुळे एका...
Read More
post-image
News महाराष्ट्र वाहतूक

बोरोटी रेल्वे यार्डमध्ये ब्लॉक! कलबुर्गी-सोलापूर पॅसेंजर रद्द

सोलापूर- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर वाडी सेक्शनच्या बोरोटी रेल्वे स्थानक यार्डमध्ये उद्या बुधवारी ट्रॉफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या काळात प्रवासी गाड्यांमध्ये...
Read More
post-image
News महाराष्ट्र राजकीय

इंदुरीकर महाराजांचा मलाच पाठिंबा! बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

अहमदनगर- संगमनेरयेथे मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज दिसल्यानंतर ते बाळासाहेबांच्या विरोधात लढणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र स्वत: इंदुरीकर महाराजांनी हे वृत्त...
Read More