दक्षिण मुंबईत एकही बेकायदेशीर मंडप नाही – eNavakal
News मुंबई

दक्षिण मुंबईत एकही बेकायदेशीर मंडप नाही

मुंबई- मुंबई शहर विभागात 132 बेकायदेशीर मंडप उभारल्याचा आरोप होत असताना इथे एकही बेकायदेशीर मंडप नाही, असा दावा मुंबई महनगरपालिकेच्या वतीने आज मुंबई न्यायालयात करण्यात आला. तर पश्चिम उपनगरांत रस्त्यांवरील एकूण 20 बेकायदेशीर मंडपांवर कारवाई केली असून आणखी 10 मंडपांवर कारवाई सुरु आहे, जी लवकरच पूर्ण होईल, असे आश्वासन महापालिकेकडून हायकोर्टाला देण्यात आले.

बेकायदेशीर मंडपांच्या यादीतील 44 मंडप हे खाजगी मालमत्तेत असल्याने त्यांच्यावर थेट कारवाई झालेली नाही, अशी माहिती पालिकेकडून उच्च न्यायालयात देण्यात आली. पश्चिम उपनगरांत केवळ 258 मंडपांना पालिकेकडून परवानगी दिली गेल्याचही पालिकेने न्यायालयात स्पष्ट केले. मुंबई पश्चिम उपनगरातील बेकायदेशीर मंडपांची संख्या दोन दिवसांत 217 वरुन 264 वर पोहचली असल्याचे यावेळी हायकोर्टाच्या निर्दशनास आणून देण्यात आले. यावर आदेश दिल्यानंतरही जर राज्यातील कोणत्याही पालिका प्रशासनाने बेकायदेशीर मंडपांन परवानगी दिली असेल, तर ही बाब कदापी खपवून घेतली जाणार नाही.

आदेश दिल्यानंतरही बेकायदेशीर मंडपांना परवानगी देणार्‍या पालिका आयुक्तांवर अवमान केल्याबद्दल कारवाई करणार अशी तंबी उच्च न्यायालयाने आज सर्व पालिकेच्या वकिलांना दिली. तसेच 19 सप्टेंबरच्या सुनावणीत पुढील कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्व महानगरपालिकांना देण्यात आलेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

सीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात

नवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम        

अखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

शशांक राव यांच्या संपामागे अदृश्य हात; शिवसेनेचे अनिल परब यांचा आरोप

मुंबई – बेस्टच्या संपात शिवसेनेला बदनाम करण्यासाठी शशांक राव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालविणारे हात अदृश्य होते, असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी...
Read More