दक्षिण कोरिया : दक्षिण कोरियातील अँपल कंपनीच्या मुख्यालयावर छापे टाकण्यात आले आहे. अँपल च्या आयफोन – एक्स ह्याची विक्री सुरु होताच हे छापे टाकण्यात आले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरियाच्या “फेअर ट्रेड कमिशन’ (पारदर्शी व्यापार आयोग) च्या अधिकाऱ्यांनी बिझनेस प्रॅक्टिससंबंधी चौकशी केली. आय फोनच्या विक्रीवर परिणाम व्हावा या उद्देशानेच हा छापा टाकण्यात अाला असल्याचा आरोप पश्चिमी मीडियाने केला आहे. हा नवा छापा त्याच चौकशीचा एक भाग असल्याचे काही सूत्रांनी सांगितले आहे. दक्षिण कोरियामध्ये शुक्रवारपासून आयफोन-X ची विक्री सुरू झाली आहे. दक्षिण कोरियातील डीलर सोबत झालेल्या करारात काही चुकीचे तर होत नाही ना यासाठीहा छापा टाकण्यात आल्याचे मत तेथील माध्यमांनी केले आहेत. आयफोन दक्षिण कोरियात फार प्रसिद्ध आहे. त्यात आयफोन ची त्या भागात विक्री होताच आयफोन च्या नफ्यात ३३% पर्यंत वाढल्याचे कळाले होते.
