दक्षिण आफ्रिकेत रेल्वे अपघात 300 जण जखमी – eNavakal
अपघात विदेश

दक्षिण आफ्रिकेत रेल्वे अपघात 300 जण जखमी

जोहान्सबर्ग – दक्षिण अफ्रिकेतील केम्पटन पार्क शहरात झालेल्या रेल्वे अपघातात 300 प्रवासी जखमी झाले आहेत. गॉटेंग मेट्रो रेल्वेचे प्रवक्ते लिलियन मोफोकेंग यांनी यासंदर्भात माहिती दिली. तसेच अपघातात जखमी झालेले सर्व प्रवासी धोक्याच्या बाहेर असल्याचेही ते म्हणाले. केम्पटन पार्क येथील के वॅन रिबीक पार्क स्टेशनवर उभ्या असलेल्या एका बिघाड झालेल्या रेल्वेला संबंधित रेल्वेने धडक दिली. मेट्रो रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित रेल्वेत काही तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे ती दुसर्‍या रेल्वेवर जाऊन आदळली. जखमी प्रवाशांना तातडीने स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण काय, याची चौकशी केली जाईल, असे दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासी रेल्वे एजन्सीने म्हटले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

दहा दिवसांच्या मुलाला रिक्षात टाकून पलायन

मुंबई- कौटुंबिक वादातून दहा दिवसांच्या आपल्याच मुलाला रिक्षात टाकून पळून गेलेल्या माता-पित्याला काल वर्सोवा पोलिसांनी अटक केली. दुर्गा महेंद्र कामत आणि अंजूदेवी दुर्गा कामत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुलवामा दहशतवादी हल्ल्यास मोदी जबाबदार! अशोक चव्हाण

सोलापूर- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास सुरक्षा यंत्रणा आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच याचे राजकारण करणार नाही परंतु...
Read More
post-image
News मुंबई

एसआरए पुनर्विकास इमारती महारेराच्या कक्षेत येणार

मुंबई – झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेंतर्गत झोपडीधारकांसाठी बांधण्यात येणार्‍या पुनर्विकास इमारती महारेराच्या कक्षेत आणण्याचा निर्णय शासनाच्या गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. अशी माहिती वाद्रे येथील...
Read More
post-image
News मुंबई

अमित शाह आज मुंबईत! शिवसेना-भाजपा युती होणार?

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिवसेनेत युती होणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र या चर्चांना आता पुर्णविराम लागण्याची शक्यता...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ उभारणार- राज्यपाल

मुंबई- क्रीडा क्षेत्राचा विकास घडविण्यासाठी औरंगाबाद येथे क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची घोषणा आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केली. आज गेट वे ऑफ इंडिया...
Read More