दंतवैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत आरक्षणाचा मार्ग मोकळा! विरोधी याचिकेवर सुनावणीस हायकोर्टाचा नकार – eNavakal
News मुंबई

दंतवैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत आरक्षणाचा मार्ग मोकळा! विरोधी याचिकेवर सुनावणीस हायकोर्टाचा नकार

मुंबई – केंद्र सरकारने खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकांना जाहीर केलेला 10 टक्के सवर्ण आरक्षणाचा कोटा वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या आणि पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेमध्ये लागू करु नये, अशी मागणी करणार्‍या याचिकेवर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने आज नकार दिला. न्यायमूर्ती भुषण गवई आणि न्यायमूर्ती डी.एस.नायडू यांच्या खंडपीठाने या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने सुनावणीस नकार देत याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयातच दाद मागण्याचा सल्ला दिला.
वैद्याकिय तसेच पदव्यूत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश देताना 10 टक्के सवर्ण आरक्षण लागू करू नये अशी विनंती करणारी याचिका वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्यावतीने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती भुषण गवई आणि न्यायमूर्ती डी.एस.नायडू यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
यावेळी केन्द्र सरकारने नुकतीच 103 वी घटनादुरुस्ती करुन आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला शिक्षण आणि सरकारी नोकर्‍यांमध्ये 10 टक्के आरक्षण लागू केले आहे. संबंधित आरक्षण राज्य सरकारने निर्धारित करण्याची मुभा केन्द्र सरकारला दिली असली तरी ती सरसकट लागू न करण्याचा पर्याय राज्य सरकारकडे उपलब्ध आहे. मात्र महाराष्ट्रात सरकारने सरसकट 10 टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे आरक्षण देऊन समाजात असमतोल निर्माण होत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला.
यावेळी राज्य सरकारच्या वतीने अ‍ॅड. व्हि.ए. थोरात यांनी 103 व्या दुरुस्तीबाबत सर्वोच्च न्यायालयात देशभरातून याचिका दाखल करण्यात आल्याने 10 टक्के आरक्षणासंदर्भात कोणत्याही न्यायालयाने निर्णय घेऊ नये. त्यावर सर्वोंच्च न्यायालयात सुनावणी हाईल असे स्पष्ट केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याची दखल घेऊन न्यायालयाने या याचिककेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
विदेश

श्रीलंकेत चर्च, हॉटेलमध्ये साखळी बॉम्बस्फोट

कोलंबो – श्रीलंकेची राजधानी कोलंबोमधील पाच चर्च आणि तीन फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाला आहे. या हल्ल्यात ८० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले...
Read More
post-image
मनोरंजन

ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाच्या वाढदिवसाचे ‘हे’ फोटो पाहिलेत?

माले – अभिषेक-ऐश्वर्या या बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध जोडीच्या लग्नाला शनिवारी तब्बल १२ वर्ष पूर्ण झाली. आपल्या लग्नाचा १२ वा वाढदिवस या दोघांनी मालदीवमध्ये साजरा केला....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या टप्प्यात २३ एप्रिलला राज्यातल्या १४ मतदारसंघांत मतदान होणार आहे. यामध्ये जळगाव, रावेर,...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या देश

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ७ ठार ३४ जखमी

मैनपुरी – उत्तर प्रदेशमध्ये आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि बसच्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#IPL2019 दिल्लीचा पंजाबवर सहज विजय

नवी दिल्ली – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारच्या दुसर्‍या लढतीत दिल्लीने पंजाबवर सहज विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करणार्‍या पंजाबला १६३ धावांत रोखण्यात यश...
Read More