थर्टीफर्स्टला तळीरामांना पोलिसांचा चाप; मुंबईत 613 तर नागपुरात 770 जणांविरोधात गुन्हे – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र मुंबई

थर्टीफर्स्टला तळीरामांना पोलिसांचा चाप; मुंबईत 613 तर नागपुरात 770 जणांविरोधात गुन्हे

मुंबई – नववर्षाच्या स्वागतावेळी रात्री ड्रंक अँड ड्राईव्ह म्हणजेच मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्या ६१३ वाहनचालकांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. तर नागपुरात 770 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

३१ डिसेंबरच्या निमित्ताने मुंबई ट्रफिक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी ड्रंक अँड ड्राईव्हसोबतच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मुंबईत ‘ओल्या’ सेलिब्रेशननंतर गाडी चालवणाऱ्या 613 चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. ३१ डिसेंबरच्या रात्री ११ वाजल्यापासून ते १ जानेवारीच्या सकाळी ८ वाजेपर्यंत मुंबई वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली. उपराजधानी नागपुरातही तळीरामांवर मोठी कारवाई करण्यात आली. नागपूर पोलिसांनी मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्या 770 जणांवर कारवाई केली. हेल्मेटशिवाय गाडी चालवल्याप्रकारणी १९९ दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात आली. तर पुण्यात दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या ११४४ वाहनचालकांवर काल रात्री वाहतूक विभागाने कारवाई केली. त्यात ९७० दुचाकी आणि १७४ तीनचाकी, चारचाकींचा समावेश आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

देवेंद्र फडणवीसच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार – अमित शहा

मुंबई – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर शिक्कामोर्तब केला. देवेंद्र...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘तुमच्याकडे काही काम नसेल तर मीम्स बनवा’, सोनाक्षीचे ट्रोलर्सना उत्तर

मुंबई – कौन बनेगा करोडपती -11 मध्ये दिलेल्या रामायण या पौराणिक कथेतील प्रश्‍नावरील उत्तरामुळे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल व्हावे लागत...
Read More
post-image
लेख

व्हिएतनाम युद्धाविरोधात उभी राहिलेली अमेरिकेची आघाडीची अभिनेत्री जेन फोंडा

साठ-सत्तरच्या दशकातील अमेरिकेची आघाडीची, सुप्रसिद्ध, नामवंत अभिनेत्री जेन फोंडा एका वेगळ्याच कारणासाठी सगळ्या जगभर ओळखली जाते आणि अमेरिकेतील लाखो लोकांकडून तिच्यावर आजही प्रखर टीका...
Read More
post-image
देश

एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिलेला गुगलची मानवंदना

नवी दिल्ली – जगप्रसिद्ध गिर्यारोहक आणि माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला जुन्को ताबेई यांचा आज 80 वा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने गुगलने खास डूडल...
Read More