‘त्या’ वक्तव्याप्रकरणी भिडेंविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल – eNavakal
News मुंबई

‘त्या’ वक्तव्याप्रकरणी भिडेंविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई- शिवप्रतिष्ठानचे संचालक संभाजी भिडे यांच्याविरोधात उच्च न्यायालयामध्ये आज याचिका दाखल करण्यात आली आहे. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता, तो एक पाऊल पुढे होता अस वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याविरोधात अ‍ॅड. नितीन सातपुते आणि सामाजिक कार्यकर्ते व भीमा कोरेगाव घटनेचे पीडित संजय रमेश भालेराव यांनी ही याचिका दाखल केली आहे. भारतीय घटनेतील अनुच्छेद 19 असलेले प्रतिबंध उपकलम 1, 2, 3, 4 व 5 खाली संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रतिबंध करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

संभाजी भिडे यांच्यावर पीसीपीडीएनटी 1994 या कायद्याअंतर्गत कलम 28 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. तसेच संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ आहे असे म्हणून संतांचा अपमान करून बहुजनांचे मन दुखावल्यानंतरही सरकारनं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे सरकारविरोधात अनुच्छेद 19 प्रतिबंध करण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे संभाजी भिडे आणि राज्य सरकारच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसत आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस फक्त नागपूरचाच विकास करतात

परभणी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज जिल्ह्यात दौर्‍यात आहेत. आपल्या खास शैलीत पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि भाजप नेत्यावर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

महिला स्पेशल लोकलसाठी बदलापुरात सेनेची स्वाक्षरी मोहीम

बदलापूर – बदलापूर येथून छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी गर्दीच्या वेळी महिला स्पेशल लोकल सोडण्याच्या मागणीसाठी बदलापूर येथे शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आज...
Read More
post-image
क्रीडा देश

भारतीय खेळाडूंना पत्नी, प्रेयसीपासून दूर राहण्याचे आदेश

लंडन – टी-20 आणि वन डे मालिका संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना संघ व्यवस्थापनाने एक महत्वाचा आदेश दिला आहे. इंग्लंडविरूद्धचे पहिले तीन सामने होईपर्यंत भारतीय खेळाडूंना...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : उंचे लोग उंची पसंद

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी संपर्क अभियान सुरू केले आहे. म्हणजे समाजातल्या मोठ्याकिंवा प्रतिष्ठित लोकांच्या भेटीगाठी घेण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. प्रत्येक राज्यात जाऊन...
Read More
post-image
महाराष्ट्र

नांदेडात चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसमध्ये 4 लाखांची लूट

नांदेड – आज पहाटे 4.50 वाजता चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसमधून चोरट्यांनी 4 लाख 24 हजारांचा ऐवज असलेली एक बॅग चोरून नेली आहे. चैन्नई ते नगरसोल जाणारी...
Read More