… त्या मनसैनिकांवर अटकेची कारवाई – eNavakal
News आघाडीच्या बातम्या राजकीय

… त्या मनसैनिकांवर अटकेची कारवाई

मुंबई – मुंबईतल्या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयासमोरील रस्ता खोदणाऱ्या 8 मनसैनिकांवर सरकारी मालमत्तेचं नुकसान आणि कायद्याचं उल्लंघन या दोन कलमांअंतर्गत अटकेची कारवाई करण्यात आली आहे. खड्ड्यांवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून सोमवारी रात्री उशिरा कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोरील रस्ता खोदून सरकारचा निषेध केला.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण- डोंबिवली या भागांमध्ये सध्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यामुळे पाच जणांचा मृत्यू झाला असून आता यावरुन मनसेही आक्रमक झाली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री उशिरा मंत्रालयसमोरील रस्ता खोदून सरकारचा निषेध केला. सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाची जाणीव सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांनाही व्हावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
देश

कर्नाटकातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराला अटक

बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना सोमवारी बंगळुरू विमानतळावरून एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बंगळुरूहून मुंबईला येत असताना आयएमए घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई...
Read More
post-image
देश

आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार

नवी दिल्ली – वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आज आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते संपूर्ण भारतातून रात्री उशिरा तीन तास दिसेल. रात्री...
Read More
post-image
महाराष्ट्र

गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीत भाविकांची मांदियाळी

अहमदनगर – आज राज्यभरात गुरूपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लोक विविध प्रकारे आपल्या गुरुंवरील प्रेम व्यक्त करत आहेत. तसेच या दिनानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कोंबडी, अंडी शाकाहारी माना! संजय राऊत यांची मागणी

मुंबई – ‘अंडे शाकाहारी की मांसाहारी’ याबाबत गेली कित्येक वर्षे वाद सुरू आहे. पण याचे ठोस उत्तर काही अद्याप सापडलेले नाही. मात्र शिवसेना खासदार...
Read More