‘त्या’ बसचालकाचा शोध लागण्याची शक्यता कमीच – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

‘त्या’ बसचालकाचा शोध लागण्याची शक्यता कमीच

दापोली – 30 जणांना मृत्यूच्या कवेत घेऊन 800 फूट खोल दरीत झेपावलेली बस बाहेर काढण्यात आली. मात्र, ज्या उद्देशासाठी ही बस बाहेर काढण्यात आली होती. तो उद्देश पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे आंबेनळी घाटात अपघाताच्या वेळी बस कोण चालवत होता याचे गूढ मात्र अधिक वाढले आहे.

आज ही बस दापोली विद्यापीठात आणण्यात आली आणि विद्यापीठाच्याच गॅरेजमध्ये ठेवण्यात आली आहे. अपघाताच्या वेळी गाडी कोण चालवत होते याचा शोध घेण्यासाठी ही बस बाहेर काढण्यात आली आहे. अपघातग्रस्त बसच्या गिअर आणि स्टेरींगवर ठसे सापडले तर नेमके कोण बस चालवत होते याचा शोध लागला असता असा तपास यंत्रणेला कयास होता. पण सव्वा दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर तपास यंत्रणेच्या हाती काहीच लागले नाही. बसच्या स्टेरींग आणि गिअरवर कुणाचेही ठसे सापडले नाहीत. साहजिक सव्वा दोन महिन्याच्या अवधीनंतर बस बाहेर काढल्यानंतर हाताचे ठसे मिळतील अशी शक्यता कमी होती. याप्रकरणी तपास यंत्रणांचे पदरी निराशा आली आहे. त्यामुळे अपघाताच्या वेळी बस कोण चालवत होते याचे गूढ मात्र अधिक वाढले आहे. मृतांच्या नातेवाईकांनी मात्र या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई – कोचिवली एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. गोव्याहून मुंबईला जाणारी ही एक्प्रेस इंजिन बिघाडामुळे रत्नागिरीजवळ पाऊण तास करबुडे बोगद्यामध्ये अडकली....
Read More
post-image
आरोग्य देश

बिहारमध्ये मेंदूज्वरामुळे १३२ जणांचा बळी

पाटणा – बिहारमध्ये मेंदूज्वर तापाचा कहर अद्यापही सुरुच असून यामुळे मृतांची संख्या १३२ वर पोहोचली आहे. तसेच इतर रुग्णालयांमध्ये उपचारांविना मृत्यू झालेल्या मुलांची आकडेवारीही अद्याप...
Read More
post-image
महाराष्ट्र

पाणीप्रश्नावरून विधानसभेत गदारोळ! १५ मिनिटे तहकूब

मुंबई – अधिवेशनाचा चौथ्या दिवशी आज विधानसभेत पाणीप्रश्नावरून प्रचंड गदारोळ झाला असून विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई हवामान

दक्षिण कोकणात मान्सूनचे आगमन

मुंबई – राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी जनता मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होती. त्यामुळे जनतेला आता दिलासा मिळाला आहे. कारण मान्सून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : शिव VS पराग आणि नेहा

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या एक डाव धोबीपछाड या साप्ताहिक कार्यात बरीच भांडणंं, वाद विवाद, आरोप–प्रत्यारोप सुरू आहेत. या टास्कमध्ये जिंकण्यासाठी बिग बॉस...
Read More