‘त्या’ दोन मुलांची हत्या पित्यानेच केल्याचे उघड – eNavakal
महाराष्ट्र

‘त्या’ दोन मुलांची हत्या पित्यानेच केल्याचे उघड

वैजापूर – तालुक्यातील सावखेडगंगा शिवारातील विहिरीत सापडलेल्या दोन मुलांच्या खुनाचा छडा लावण्यात वीरगाव पोलिसांना यश आले आहे. ‘त्या’ दोन मुलांना निष्ठूर पित्यानेच रागाच्या भरात विहिरीत ढकलून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून पोलीस त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरवत आहेत. ही दोन्ही भावंडे कन्नड तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील रहिवासी असून त्यांची नावे कृष्णा संतोष वाळुंजे (3) व गणेश संतोष वाळुंजे (5) अशी आहेत.
पोलिसांनी संशयित पित्यास ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु केली आहे. त्यामुळे लवकरच आरोपीला गजाआड केले जाण्याची शक्यता आहे.

आरोपी संतोष याला दोन्ही मुलांसह सराला बेट येथे काही ग्रामस्थांनी पाहिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. हे प्रकरण वीरगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने उघड झाले.
वैजापूर तालुक्यातील बापूसाहेब कल्याण पवार यांच्या सावखेडगंगा येथील शेत गट नंबर दोन मधील विहिरीत शनिवारी दुपारी दोन मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. ही दोन्ही मुले वैजापूर तालुक्यातील नसल्याचे पोलिसांच्या तपासात लक्षात आल्यानंतर पोलिसांनी नगर येथील तोफखाना पोलिसांच्या मदतीने तपासाची चक्रे फिरवली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पुजार्‍यांना मंदिराच्या ट्रस्टी बनण्यापासून रोखता येणार नाही! हायकोर्टाचा निर्णय

मुंबई – राज्यातील मंदिरातील पुजारी तसेच अन्य काम करणार्‍या व्यक्तींची सेवा ही मंदिराच्या विरोधात नाही. त्यामुळे त्यांना मंदिराच्या विश्वस्त पदी नियुक्त करण्यापासून रोखता येणार...
Read More
post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More