‘त्या’ तिन्ही डॉक्टर आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी – eNavakal
आघाडीच्या बातम्या न्यायालय मुंबई

‘त्या’ तिन्ही डॉक्टर आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई – नायर रुग्णालयाच्या एमबीबीएस डॉक्टर पायल तडवीच्या आत्महत्या प्रकरणाने आता संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. डॉ. पायल तडवी हिला आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या डॉ. भक्ती मेहरे, डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. हेमा आहुजा यांना न्यायालयाने ३१ मेपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले होते. त्यांची ही शिक्षा वाढविण्यात आली असून १० जूनपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे. तसेच हे आत्महत्येचेच प्रकरण असून ही हत्या नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी गुन्हे शाखेकडे सोपविली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्रीदेखील आहेत.
डॉ. पायल तडवी हिच्या कुटुंबीयांनी दोन दिवसांपूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी या कुटुंबाने पायल तडवीच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडून काढून घेऊन गुन्हे शाखेकडे सोपविली आहे.
मुंबई पोलिसांनी पायल तडवी हिने आत्महत्या केल्यानंतरही आरोपी डॉक्टरांना अटक केली नव्हती. तसेच पायलच्या शरीरावर मारहाणीचे व्रण असतानाही शवविच्छेदनात याबाबत माहिती नसल्याने पायलच्या कुटुंबियांना संशय आहे. याबाबत संबंधित डॉक्टर्सची, डिपार्टमेंट हेडची व पायलच्या सहकार्‍यांची चौकशी करण्यात आली नसल्याचीही कुटुंबियांची तक्रार आहे. त्यामुळेच हा तपास आता गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. नायर हॉस्पिटलच्या अटकेत असलेल्या 3 डॉक्टर्सविरोधात रॅगिंग प्रतिबंधक आणि अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५० टक्के मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More