‘त्या’ चार वॉर्डातील पोटनिवडणुका जाहीर करू नका! हायकोर्टाचा निवडणूक आयोगाला आदेश – eNavakal
News मुंबई

‘त्या’ चार वॉर्डातील पोटनिवडणुका जाहीर करू नका! हायकोर्टाचा निवडणूक आयोगाला आदेश

मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्या चार नगरसेवकांची निवड रद्द झाल्यानंतर पोटनिवडणुकीचा घाट घालणार्‍या निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयाने आज दणका दिला. पश्चिम उपनगरांमधील 28 ,81, 76 आणि 32 या चार रिक्त झालेल्या वॉर्डमधील केवळ मतदार याद्या अद्यावत करण्याचे काम पूर्ण करा. मात्र 12 जूनपर्यंत निवडणूक कार्यक्रम जाहीर करू नका, असा आदेश सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार खंडपीठाने निवडणूक आयोगाला दिला आणि याचिकांची पुढील सुनावणी नियमित न्यायालयासमोर 10 जूनला निश्चित केली.
2017 च्या निवडणुकीत कॉग्रेस नगरसेवक राजपती यादव (वॉर्ड 28) भाजपाचे नगरसेवक मुरजी पटेल. (वार्ड नं. 81 ) भाजपा नगरसेवक केशवबेन पटेल (वार्ड नं. 76 )आणि काँग्रस नगरसेवक स्टेफी केणी (वॉर्ड नं. 32 ) मधून विजयी झाले. मात्र त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर नगरसेवक पद रद्द करण्यात आले. या रिक्त जागावर पोट निवडणूक घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. त्यानुसार मतदार याद्या बनविण्याचा कार्यक्रम जाहीर केला. तशी अधिसूचना 9 मे रोजी जाहीर केली. या अधिसूचनेविरोधात निवडणुकीत पराभूत झालेल्या आणि दोन क्रमांकावर असलेल्या शिवसेनेच्या शंकर हुंडारे, संदीप नाईक, गीता भंडारी आणि काँग्रेसचे नितीन सलागरे यांच्या वतीने अ‍ॅड. संजीव कदम अ‍ॅड.राजू पै आणि अ‍ॅड. चिंतामण भणंगोजी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. त्या याचिकांवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती एन जे जमादार यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.
यावेळी याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. राजू पै, अ‍ॅड. संजीव कदम आणि अ‍ॅड. चिंतामण भणंगोजी यांनी निवडणूक आयोगाच्या मतदार याद्या अद्यावत करण्याच्या अधिसूचनेला जोरदार आक्षेप घेतला. नगरसेवक पद रद्द झालेल्या नगसेवकांच्या निवडीला पालिका कायदा कलम 33 (2) अन्वये कनिष्ट न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्याचा निर्णय झालेला नाही असे असताना निवडणुक आयोग पोट निवडणुकीसाठी मतदार याद्या अद्यावत करण्याचे करण्याचे काम सुरू करू शकत नाही, अथवा निवडणूक कार्यक्रम जाहिर करून शकत नाही, अशाप्रकारे आकस्मिकपणे निवडणुका जाहीर केल्यास याचिकादारांच्या कनिष्ट न्यायालयात प्रलंबित असलेल्या दाव्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. अशी भिती व्यक्त करून या मतदार याद्या बनविण्याची अधिसुचना रद्द करावी अशी विनंती केली. यावेळी आयोगाच्या वतीने अ‍ॅड. ईरफान शेख यांनी आयोगाने केवळ मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला नसल्याचे न्यायालयात स्पष्ट केले. याची दखल घेऊन न्यायालयाने केवळ मतदार यादी तयार करण्याचे काम पूर्ण करा, मात्र 12 जूनपर्यंत पोटनिवडणुकीचा कार्य जाहीर करून नका, असा आदेश निवडणूक आयोगाला देत याचिकेची पुढील सुनावणी 10 जूनपर्यंत तहकूब ठेवली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

आसाममध्ये भूकंपाच्या धक्क्याने घबराट

गुवाहटी – मुसळधार पावसामुळे पूरस्थितीत अडकलेल्या आसाममध्ये आज दुपारी भूकंपाचा धक्का जाणवला. दुपारी २.५१ वाजता झालेल्या या भूकंपाची रिश्टर स्केलवर तीव्रता ५.९ इतकी होती....
Read More
post-image
महाराष्ट्र

प्रचारासाठी मी पुन्हा येणार आहे, तेव्हा निवडणुका जिंकूच! आदित्य ठाकरे

धुळे – युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ‘ही जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी नाही. नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी आहे’, असे...
Read More
post-image
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे उद्या नाशिक शहरात जाणार

नाशिक – शिवसेना नेते आणि युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ‘ही जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी नाही....
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : सोज्वळ अभिनेत्री उमा भेंडे

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म ३१ मे १९४५ साली कोल्हापूर येथे झाला. सोज्वळ अभिनेत्री म्हणून उमा भेंडे यांनी मराठी रसिक मनावर...
Read More
post-image
देश

सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता! ३६ हजाराच्या घरात जाणार

मुंबई – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने सोने महागण्याची चिन्हे दिसत आहेत. आज सोन्याचा भाव सर्वाधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याच्या विचारात...
Read More