त्याने आत्महत्त्येचं केलं फेसबुक लाइव – eNavakal
News देश

त्याने आत्महत्त्येचं केलं फेसबुक लाइव

नवी दिल्ली – सैन्यात भरती होण्याची तीव्र इच्छा असताना भरती होण्यास अपयश आल्याने उत्तरप्रदेशमधील आग्रा येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्त्या केली. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाने आपल्या आत्महत्त्येचं फेसबुक लाइव केलं. या फेसबुक लाइव व्हिडीओमध्ये त्याने गळफास घेण्यापासून त्याचा जीव जाईपर्यंत सर्व दृश्य कैद आहेत. ही घटना आग्राच्या रेणुका विहार कॉलनीमध्ये घडली.  मुन्ना कुमार असे या तरुणाचे नाव असून त्याचे वय १७ वर्ष इतके होते. त्याने नुकतीच बीएसई परीक्षा पास केली असून त्याला भारतीय सैन्यात भरती होण्याची खूप इच्छा होती.

सैन्यात भरती होण्यासाठी अनेक अडथळे येत असल्याने मुन्नाने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. गळफास घेण्यापूर्वी त्याने २ पानांची सुसाईड नोट लिहिली. या नोटमध्ये त्याने आपलं दु:ख व्यक्त केलं, आई वडिलांची माफी मागितली आणि शेवटी ‘जय हिंद’ म्हटलं.

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

महिला स्पेशल लोकलसाठी बदलापुरात सेनेची स्वाक्षरी मोहीम

बदलापूर – बदलापूर येथून छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी गर्दीच्या वेळी महिला स्पेशल लोकल सोडण्याच्या मागणीसाठी बदलापूर येथे शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आज...
Read More
post-image
क्रीडा देश

भारतीय खेळाडूंना पत्नी, प्रेयसीपासून दूर राहण्याचे आदेश

लंडन – टी-20 आणि वन डे मालिका संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना संघ व्यवस्थापनाने एक महत्वाचा आदेश दिला आहे. इंग्लंडविरूद्धचे पहिले तीन सामने होईपर्यंत भारतीय खेळाडूंना...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : उंचे लोग उंची पसंद

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी संपर्क अभियान सुरू केले आहे. म्हणजे समाजातल्या मोठ्याकिंवा प्रतिष्ठित लोकांच्या भेटीगाठी घेण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. प्रत्येक राज्यात जाऊन...
Read More
post-image
महाराष्ट्र

नांदेडात चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसमध्ये 4 लाखांची लूट

नांदेड – आज पहाटे 4.50 वाजता चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसमधून चोरट्यांनी 4 लाख 24 हजारांचा ऐवज असलेली एक बॅग चोरून नेली आहे. चैन्नई ते नगरसोल जाणारी...
Read More
post-image
महाराष्ट्र

धुळ्यात सेनेचे दोन महानगरप्रमुख तुरुंगात; महालेंना दिला डच्चू

धुळे – शिवसेनेतर्फे धुळ्यासाठी दोन महानगरप्रमुख पदांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरप्रमुख असलेले सतिश महाले भूसंपादन मोबदला हडपल्याप्रकरणी अमळनेरमध्ये दाखल गुन्ह्यात सध्या जळगाव कारागृहात...
Read More