…तेव्हाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करू – रामदास आठवले – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

…तेव्हाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करू – रामदास आठवले

मुंबई – कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या 14 एप्रिलपर्यंत जनता कर्फ्यु लावला आहे. कोरोना हा साथीचा रोग गर्दीतून अधिक पसरतो. त्यामुळे आता सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची ही वेळ नाही. कोरोना या महामारी विरुद्ध लढण्याची ही वेळ आहे. त्यामुळे या वर्षी 14 एप्रिल रोजी येणारी भीम जयंती घरी थांबूनच साजरी करू. कोरोनाविरुद्धचा लढा जिंकल्यानंतर 14 एप्रिलनंतर आपण भीम जयंती साजरी करू. त्याआधी कोरोना विरुद्धचे युद्ध जिंकण्याचा संकल्प करा, संयम ठेऊन घरीच थांबा, असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

दरवर्षी 14 एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धुमधडाक्यात साजरी होते. यावर्षी मात्र सार्वजनिक कार्यक्रम साजरा करण्याची वेळ नाही. यंदा गुढी पडव्याच्याही शोभायात्रा रद्द करण्यात आल्या होत्या. सर्व सार्वजनीक कार्यक्रम रद्द करावेत आणि जनतेने घरीच राहून येत्या 14 एप्रिलपर्यंत 21 दिवसांचा जनता कर्फ्यु यशस्वी करावा असे सांगत, आठवले यांनी ‘आपणच आहोत आपले रक्षक, नका होऊ स्वतःचे भक्षक’, असे आपल्या काव्यात्मक शैलीत आवाहन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हातावर पोट असणाऱ्या कामगारांसाठी 1 हजार 70 लाख कोटींचे पॅकेज जाहीर करून गरिबांना नवी संजीवनी दिली आहे. असे सांगत भारत सरकारच्या या निर्णयाचे त्यांनी स्वागत देखील केले आहे.

कोरोना महामारीमुळे हातावर पोट असणारे असंघटित कामगार, गोरगरीब झोपडपट्टीवासी, रोजंदारी मजुरांची आर्थिक स्थिती बिकट आहे. ज्यांनी कर्ज घेतले आहे अशा लोकांचे मासिक हफ्ते भरण्यास बँकांनी मार्च आणि एप्रिल महिन्याची सूट द्यावी. दोन महिन्यांचे रेशन अन्नधान्य गरिबांना मोफत द्यावे. त्यासाठी केंद्र सरकारने मदत जाहीर केली आहे. आता खाजगी उद्योगपती, उद्योजकांनी सीएसआर फंडातून गरिबांना मदत करावी, असं आवाहन आठवले यांनी केले आहे.

14 एप्रिलला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभर मोठया उत्साहात साजरी होते. यंदा मात्र कोरोना चा धोका असल्याने कोरोना विषाणू चा नायनाट होईपर्यंत आंबेडकरी जनतेने संयम पाळावा. पंतप्रधानांनी आवाहन केल्यानुसार 14 एप्रिलपर्यंत जन संचारबंदी लॉकडाऊन पाळावा. कोरोना साथीच्या रोगाचा खातमा झाल्यानंतरच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी असे आवाहन ना रामदास आठवले यांनी आज केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

भारतात २४ तासांत २२ हजार ५७२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली – जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने भारतात हाहाकार माजवला आहे. देशात गेल्या २४ तासात २२ हजार ५७२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली...
Read More
post-image
विदेश

अमेरिकेने डब्ल्यूएचओ सोडले! संघटनेवर चीनच्या वर्चस्वाचा आरोप

वॉशिंग्टन – कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून जागतिक आरोग्य संघटनेवर नाराज असलेल्या अमेरिकेने या संघटनेचा निधी बंद केल्यानंतर आता या संघटनेतून बाहेर पडल्याचा निर्णयच जाहीर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे महाराष्ट्र

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला २८ दिवसांचा फर्लो मंजूर! लवकरच घरी परतणार!

नागपूर – अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला पुन्हा एकदा 28 दिवसांचा फर्लो मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला मंगळवारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये २४ तासांत सेनेच्या २ नगरसेवकांचा कोरोनाने मृत्यू

औरंगाबाद – औरंगाबाद शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून नागरिकांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरणारे राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधीही आता त्याचे बळी ठरत आहेत. त्यात गेल्या २४ तासांत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज्यातील हॉटेल, लॉज आजपासून पुन्हा खुले होणार

मुंबई – महाराष्ट्रातील हॉटेल आणि लॉज आजपासून पुन्हा सुरू होणार आहेत. कंटेन्मेंट झोनबाहेरील हॉटेल्स 33 टक्के क्षमतेसह चालवण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, एखादे...
Read More