तेलुगु कवी वरावरा राव यांना कोरोनाची लागण – eNavakal
देश

तेलुगु कवी वरावरा राव यांना कोरोनाची लागण

मुंबई – तळोजा तुरुंगात असलेले वरावरा राव यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारानंतर त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आलं.

८१ वर्षीय तेलुगू कवी वरावरा राव गेल्या दीड वर्षांहून अधिक काळापासून गजाआड आहेत. गेल्या महिन्यात तुरुंगातच त्यांना अशक्तपणा आल्याने त्यांना जे.जे रु्ग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तब्येतीच्या कारणात्सव तात्पुरत्या जामिनासाठी एनआयए न्यायालयात अर्ज केला होता. आपण आधीच विविध आजारांनी ग्रस्त असून कोरोनामुळे धोका अधिक वाढला असल्याने जामीन द्यावा, अशी विनंती त्यांनी केली होती. कोरोनाची चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे.

तळोजा तुरुंगात असलेले वरवरा राव यांच्या शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी झाल्यानं त्यांना काही दिवसांपूर्वीच जे.जे रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पूर्ण उपचारांआधीच पुन्हा त्यांना तुरुंगात हलविले गेले. त्यामुळं उच्च रक्तदाब व हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या राव यांच्या जिवाला धोका असल्यानं त्यांना पुन्हा जे.जे रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करावेत अशी मागणी करण्यात येत होते.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

तंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ऑगस्टपासून

मुंबई – शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता तंत्रशिक्षण (पॉलिटेक्निक ) प्रथम वर्ष  पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्ट २०२० या कालावधीत राबविण्यात येणार आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश विदेश

गुड न्यूज! भारतात २०२१ साली विश्वचषक होणार

मुंबई – भारतामध्ये होणारा विश्वचषक वेळेनुसार २०२१ साली होणार आहे. आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. आयसीसीने काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियामधील ट्वेन्टी-२० विश्वचषक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

आज राज्यात 10 हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद, तर 300 मृत्यू

मुंबई – राज्यात आज 10 हजार 483 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख 90 हजार 262 वर पोहोचला आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला बसणार चाप, भरारी पथके नेमण्याचे आदेश

मुंबई – राज्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. यासर्व निर्देशांच्या अंमलबजावणीसाठी आणि तपासणीसाठी राज्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीत २३९  नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज २३९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून ३२७  जणांना गेल्या २४...
Read More