तेलंगणात नक्षलवाद्यांकडून टीआरएस नेत्याची हत्या – eNavakal
News देश

तेलंगणात नक्षलवाद्यांकडून टीआरएस नेत्याची हत्या

तेलंगणा – तीन दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या टीआरएस पक्षाच्या नेत्याची आज छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील पुट्टपडू गावात गोळ्याझाडून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. नल्लूरी श्रीनिवास राव असे या नेत्याचे नाव आहे. राव हे तेलंगणा राष्ट्र पक्षाचे एमपीटीसी होते.
एन.श्रीनिवास राव यांचे सोमवारी मध्यरात्री कोथूर गावातून नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते. जवळपास दहा ते पंधरा अज्ञातांनी हातात लाठ्या-काठ्या, शस्त्रे घेऊन राव यांना मारहाण केली. त्यानंतर घरातून त्यांना बाहेर फरफटत आणले. राव यांच्या पत्नीने या अज्ञात नक्षलवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र अज्ञातांनी बंदुक रोखत, धमकावत त्यांना घराबाहेर पडू दिले नाही. अखेर आज राव यांचा मृतदेह आढळून आला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५० टक्के मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More