तेज बहाद्दूर यादव यांची उमेदवारी रद्द – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश निवडणूक

तेज बहाद्दूर यादव यांची उमेदवारी रद्द

वाराणसी – वाराणसी मतदारसंघातून समाजवादी पार्टीने आपला उमेदवार बदलत बीएसएफ जवान तेजबहादूर यादव यांना उमेदवारी दिली होती. तेजबहादूर यादव यांना वाराणसीत मोदीविरोधात रिंगणात उतरवले होते. मात्र तेज बहाद्दूर यादव यांची उमेदवारी निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. ‘मंगळवारी संध्याकाळी मला पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले. मी पुरावे सादर केले. तरीही माझी उमेदवारी रद्द केली. उमेदवारी चुकीच्या पद्धतीने रद्द करण्यात आली असून आम्ही या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाऊ’ असे तेज बहाद्दूर यांनी म्हटले आहे.

समाजवादी पक्षाने यापूर्वी वाराणसी मतदारसंघातून शालिनी यादव यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी आपला उमेदवारी अर्जही भरला होता. मात्र समाजवादी पक्षाने  आपला निर्णय बदलत जवान तेजबहादूर यादव यांना वाराणसीत मोदीविरोधात रिंगणात उतरवले. तेजबहादूर काही दिवस चांगलेच चर्चत होते. त्यांनीजवानांना मिळणाऱ्या निकृष्ट जेवणाबाबत आवाज  उठवला होता. मात्र त्यामुळे यादव यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. सुरुवातीला यादव यांनी मोदींविरोधात अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र समाजवादी पार्टीने त्यांना उमेदवारी दिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात उड्डाण पुलाखाली स्फोट; एकाचा मृत्यू

कोल्हापूर – राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना कोल्हापुरात शुक्रवारी भीषण स्फोट झाला. पुणे-कोल्हापूर महामार्गावरील उड्डाणपुलाखाली स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला. ही घटना शक्रवारी रात्री अकरा...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

‘चंपा’ कोणी तयार केला, हे निवडणुकीनंतर सांगेन – अजित पवार

पुणे – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा असे संबोधल्यानंतर राज्यभरात या नावाची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More