तूर्भ्यातील इंधन डेपोची सुरक्षा वाऱ्यावर – eNavakal
News मुंबई

तूर्भ्यातील इंधन डेपोची सुरक्षा वाऱ्यावर

नवी मुंबई – चेंबूरच्या रिफायनरी प्रकल्पामध्ये आग लागल्यानंतर आता औद्योगिक क्षेत्रातील तुर्भे येथील आय पी सी एल आणि बी पी सी एल या दोन इंधन डेपोच्या सुरक्षा व्यवस्थेची चर्चा ऐरणीवर आली आहे. या दोन डेपोच्या सुरक्षा कुंपणालगतच वाणिज्य संकुलाच्या भिंती बांधण्यात आल्या असून या अती संवेदनशील परिसराला यामुळे धोका निर्माण झाला आहे. चेंबूरच्या आग लागण्याच्या पार्श्वभूमीवर आता तूर्भ्यातील या इंधन डेपोच्या सुरक्षेकडे लक्ष वेधण्यात आले आहे

तुर्भे येथे औद्योगिक वसाहतीमध्ये आय पी सी एल व बी पी सी एल या केंद्र सरकारच्या कंपन्यांचे मोठे डेपो असून या डेपोमधून राज्यभरात इंधन वितरण केले जाते. या डेपोमधील टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलचा साठा आहे. या डेपो लगत रहेजा हे नव्याने विकसित झालेले आलिशान वाणिज्य संकुल उभारण्यात आले आहे. या संकुलाची भिंत आणि डेपोची भिंत जोडून असून या सुरक्षा भिंतीची उंची अत्यंत कमी असून या परिसरात प्रवेश निषिद्ध आहे. मात्र संकुलाच्या इमारतीमधील जागेमधून कोणीही सहज प्रवेश करू शकतं. यामुळे या परिसराला संभाव्य धोका निर्माण होण्याची भीती पर्यावरण सेवाभावी संस्थेने थेट पोलिसांकडे व्यक्त केली आहे. वाणिज्य संकुलातील वाहनांची पार्किंग डेपोच्या शेजारीच केली जात आहे. सुरक्षा रक्षक तपासणी करत असले तरी ही तपासणी तकलादू ठरत आहे. इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून या डेपो परिसराची सहज टेहळणी करता येते. परिणामी याबाबत पोलिसांनी अपेक्षित कारवाई करायला हवी अशी मागणी केली जात आहे.

यापूर्वी पोलिसांनीच हा परिसर सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील घोषित केला आहे. डेपो परिसरात केंद्रीय सुरक्षा बलाची सुरक्षा व्यवस्था आहे. मात्र हे सुरक्षा रक्षक डेपोच्या परिसरात लक्ष ठेवून असतात. मात्र डेपो लगत असलेल्या व्यावसायिक संकुलाच्या जागेमध्ये धोका वाढण्याची शक्यता आहे. या इमारतीमध्ये नवीन बांधकाम सुरू असल्याने मजुरांचा वावर मोठ्या पमाणात सुरू आहे. हे मजूर धूम्रपान करत असताना एखादी ठिणगी देखील मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारी ठरू शकते. हे वाणिज्य संकुल एक मोठी रसायन कंपनी बंद करून त्या जागेवर बांधण्यात आले आहे. यापूर्वी या परिसरात आग लागण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

12 हजार ग्राहकांचा पुरवठा आठ तास खंडित

वसई –  महावितरणच्या वसई उपविभागांतर्गत येणार्‍या सातीवली गावातील 22 केव्ही ट्रान्सफॉर्मरच्या यंत्रणेशी अज्ञात व्यक्तीने छेडछाड केल्यामुळे 12 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा चार दिवसांपूर्वी बाधित होऊन...
Read More
post-image
News अपघात

दर्शनावरून परतणार्‍या भाविकांच्या कारला अपघात ! 8 जखमी

महागाव – माहुर येथुन देवदर्शन करून परत येणार्‍या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. अपघातात 3 महिला गंभीर जखमी झाल्या असून पाचजण किरकोळ जखमी...
Read More
post-image
Uncategoriz

अजयने शेअर केला पत्नी काजोलचा मोबाईल नंबर

मुंबई – आपल्या आवडत्या अभिनेत्याचा किंवा अभिनेत्रीचा पर्सनल मोबाईल नंबर मिळावा आणि त्यांच्याशी एकदा तरी फोनवर प्रत्यक्षात बोलता याव अशी इच्छा प्रत्येक चाहत्याची असते....
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – गणेशमंडळांनाच समुपदेशनाची गरज

गणेशविसर्जनाच्या काळात सर्व प्रकारची काळजी घेऊनही अनेकांचे बळी जाण्याचा प्रकार धक्कादायक ठरतो. याबद्दलचा निश्चित आकडा उपलब्ध झाला नसला तरी दोन लहान मुले आणि नाशिकच्या...
Read More