तुळशी तलाव तुडुंब – eNavakal
News महाराष्ट्र

तुळशी तलाव तुडुंब

मुंबई- मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव काठोकाठ तुडुंब भरला आहे. गेल्या काही दिवसांपासून धऱणक्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तुळशी तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाला आहे.
तुळशी तलावाची पाणीसाठ्याची क्षमता 139.17 मीटर इतकी आहे. आज सकाळी या तलावाने 137.10 मीटर एवढी पाणी पातळी गाठली. मुंबईत पाणीपुरवठा करणार्‍या सात तलावांपैकी तुळशी तलाव हा एक तलाव आहे. मुंबईला वर्षाला 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा लागतो. सध्या तलावात 6 लाख 35 हजार 259 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. मुंबई आणि धरणक्षेत्र परिसरात असाच पाऊस सुरू राहिल्यास मुंबईत सुरू असलेली दहा टक्के पाणी कपात रद्द होऊ शकते, असे एका पालिका अधिकार्‍याने सांगितले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

कल्याण स्थानकाजवळ ओव्हरहेड व्हायर पडून २ महिला जखमी

मुंबई – मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकाजवळ ओव्हरहेड व्हायर पडल्याने २ महिला जखमी झाल्या आहेत. तर या मार्गावरील अप आणि डाऊन दोन्ही दिशेने जाणारी वाहतूक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

कॉंग्रेस-जेडीएसच्या बंडखोरांचा आज फैसला

नवी दिल्ली – कर्नाटकातील राजकीय नाट्यावर आज निकाल लागण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस आघाडीच्या १५ बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा आज निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज 17 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More