तुरुंगात असलेले रमेश कदम ठाण्यातील घरात; ५३ लाखांची रोकड जप्त – eNavakal
महाराष्ट्र

तुरुंगात असलेले रमेश कदम ठाण्यातील घरात; ५३ लाखांची रोकड जप्त

ठाणे – राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ठाण्यातील घोडबंदर येथील एका खासगी फ्लॅटमध्ये ५३ लाख ४६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ठाणे पोलीस व निवडणूक आयोगाच्या पथकाने ही कारवाई केली. धक्कादायक म्हणजे ही कारवाई करताना पोलिसांना घटनास्थळी अण्णाभाऊ साठे महामंडळातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ठाणे मध्यवर्ती कारागृहात कैदेत असलेले आणि विधानसभा निवडणुकीतील मोहोळ मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार आमदार रमेश कदम आणि फ्लॅटमालक राजू खरे हे दोघे आढळून आले. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून नियमानुसार तातडीने सक्त कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. हा फ्लॅट सिल बंद करण्यात आला असून रमेश कदम यांना ठाणे तुरुंग अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सांगितले आहे.

साठे महामंडळातील भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. सध्या ते ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैदेत आहेत. १८ ऑक्टोबर रोजी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले होते. तपासणीनंतर ठाण्यातील घोडबंदर रोडवर राहणाऱ्या मित्राकडून महत्त्वाचे पार्सल घ्यायचे असल्याचे कदम यांनी त्यांच्यासोबत असलेल्या पोलिसांना सांगितले. पोलिसांनीही नियम मोडत त्यांची ही मागणी मान्य केली आणि मुंबईतून कदम यांना थेट कारागृहात नेण्याऐवजी घोडबंदर रोड, ओवळा येथील पुष्पांजली रेसिडेन्सी इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील राजू खरे यांच्या ३०१ क्रमांकाच्या फ्लॅटवर नेले. तिथून कदम हे पार्सल घेऊन निघण्याच्या तयारीत असतानाच ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग आणि निवडणूक विभागाने फ्लॅटवर छापा टाकला. त्यांच्याकडील पार्सलची तपासणी केली असता त्यामध्ये ५३ लाख ४६ हजारांची रोकड आढळून आली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

ज्युलियन असांजेला दिलासा; बलात्काराचा गुन्हा रद्द

लंडन – अमेरिकेसह अन्य देशांची गोपनीय राजनैतिक व लष्करी कागदपत्रे उघड करून जगभरात खळबळ उडवून देणारा ‘विकिलीक्स’चा संस्थापक ज्युलियन असांजे याला मोठा दिलासा मिळाला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘चैत्या’ आता तेलुगू चित्रपटात झळकणार

मुंबई – अभिनेते, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘नाळ’ चित्रपटातून झळकलेला राष्ट्रीय पुरस्कार विजेता बालकलाकार श्रीनिवास पोकळे अर्थात सर्वांचा लाडका चैत्या आता तेलुगू चित्रपटात दिसणार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र राजकीय

संध्याकाळी ५ वाजता कॉंग्रेस-एनसीपी बैठक; सोनिया गांधी आणि पवार उपस्थित राहणार नाहीत

मुंबई – आज संध्याकाळी ५ वाजता राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची बैठक पार पडणार आहे. परंतु या बैठकीत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि...
Read More
post-image
News मुंबई

संजय राऊत यांनी पुन्हा घेतली शरद पवारांची भेट

मुंबई- कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या आज दिल्लीतील बैठका रद्द करण्यात आल्याने महाराष्ट्रातील सत्तापेचाबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. त्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी आज सलग...
Read More
post-image
News मुंबई

टिकटॉक विरोधी याचिकेवर तातडीने सुनावणीस कोर्टाचा नकार

मुंबई- तरुणाईपासून वृध्दांना वेड लावणार्‍या टिकटॉक हे मोबाईल अ‍ॅप रोखा अशी विनंती करणार्‍या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने आज तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. न्यायमूर्ती सत्यरंजन...
Read More