तुकोबांच्या रथासाठी यंदा ’हौशा-नवशा’ आणि ’सर्जा-राजा’ – eNavakal
News आजच्या ठळक बातम्या महाराष्ट्र

तुकोबांच्या रथासाठी यंदा ’हौशा-नवशा’ आणि ’सर्जा-राजा’

देहू -जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 333 व्या पालखी सोहळ्यातील पालखी रथ ओढण्याचा मान यंदा मुळशी तालुक्यातील माणगाव येथील प्रणव दशरथ शेळके यांच्या ‘हौशा-नवशा’ आणि खेड तालुक्यातील कुरूळी येथील बाळासाहेब सोपान कड यांच्या ‘सर्जा-राजा’ या बैलजोडींना देण्यात आला आहे. पालखी सोहळा प्रमुख सुनील दामोदर मोरे यांनी ही नावे जाहीर केली.

यावेळी सोहळा प्रमुख विठ्ठल मोरे, अशोक मोरे, अध्यक्ष बाळासाहेब मोरे, विश्वस्त अभिजित मोरे, जालिंदर मोरे, सुनील दिगंबर मोरे आदी उपस्थित होते. पालखी सोहळ्यातील रथाला ओढण्यास आपल्या बैलजोडीची निवड होऊन सेवा करण्याचा मान मिळावा यासाठी पुणे जिल्ह्यातून 13 शेतकर्‍यांनी संस्थांकडे अर्ज केले होते. सर्व अर्जांचे परीक्षण करून त्यातील दोन बैलजोड्यांची निवड करण्यात आली आहे. या परीक्षणामध्ये बैलांचे वय, छाती, शिंगे, वशींड, रंग, शेपटी, खूर, उंची, शुभ्रता, त्यांची काम करण्याची क्षमता आदी पाहणी करून वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यात आल्याची माहिती, विश्वस्त अभिजित मोरे यांनी दिली.

पालखी प्रमुख मोरे म्हणाले की, पालखी सोहळ्यात पालखीच्या रथाचे मानकरी असलेल्या बैलांची, मानाच्या अश्वांची, नगारखान्याच्या बैलांची चोख व्यवस्था ठेवली जाते. या सर्वांना पिण्यासाठी शुद्ध पाणी, आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था, बैलांना पोषक चारा, दररोज तज्ज्ञ वैद्यकीय अधिकार्‍यांकडून तपासणी केली जाते. नंतरच रथाला जुंपले जातात.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

दहा जिल्ह्यातून प्रवास करून ते सहाजण पोहचले गावाला

वर्धा – भारतातील सर्व राज्य आणी जिल्ह्यांच्या सीमा बंद असूनही तब्बल दहा जिल्ह्यातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून सहा मजूर आपल्या गावी पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईत ५२६ कोरोनाग्रस्त, ३४ जणांचा मृत्यू

मुंबई – जगभरातील शेकडो देशांमध्ये थैमान घ्यालणाऱ्या कोरोना व्हायरसची भारतातही दहशत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. देशात सध्या 4,281 कोरोनाग्रस्त असून बळींचा आकडा...
Read More
post-image
महाराष्ट्र

सीईटी बरोबर विद्यापीठाच्या परीक्षा होणार – सामंत

मुंबई – राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील सर्व विद्यापीठे आणि त्यांच्या अखत्यारीतील महाविद्यालयीन परीक्षेसह सीईटी परीक्षा होणारच आहेत. राज्यातील कोरोना परिस्थिती...
Read More
post-image
देश

तबलिगी जमातच्या संपर्कातील दीड हजार जणांना कोरोना संसर्ग

नवी दिल्ली – देशातील कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 4 हजार 67 इतकी झाली आहे. त्यात तबलिगी जमातच्या संपर्कात आलेल्या दीड हजार जणांचा समावेश आहे....
Read More
post-image
देश

सॅनिटायझरच्या उत्पादन वाढीसाठी उत्तर प्रदेशात 55 कंपन्यांना परवाने

लखनऊ – कोरोनाचे संक्रमण थोपवण्यासाठी हॅन्ड सॅनिटायझरचे उत्पादन वाढावे यासाठी उत्तर प्रदेश सरकारने 55 कंपन्यांना नवीन परवाने दिले आहेत. या कंपन्या रोज जवळपास 70...
Read More