ती तरूणी कोण होती? – eNavakal

मुंबई – आज रविवार…सकाळी ८.३० ची वेळ…कॉफर्ड मार्केटपासून मेट्रो सिनेमागृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक महागडी कार चालली होती. तेवढ्यात जीटी हॉस्पिटलजवळ सिग्नल लागल्याने रस्त्यावरील गाड्या थांबल्या आणि त्या कारमधील एक तरूणी चालकाच्या बाजूच्या सीटवर उभी राहून कारच्या सनरूफमधून बाहेर आली. आजूबाजूच्या गाड्यांमध्ये बसलेले सर्वच जण त्या तरूणीकडे आश्चर्याने बघू लागले. पण ती त्या सर्वांना हाय, हॅलो…सर्वांनी मस्त राहा…हसत राहा…हसत जीवन जगा असं मोठमोठ्याने ओरडून सांगत होती. काहींनी तिला विचारले की, तू असं का करतेय? त्यावर ती म्हणली…असंच, सर्वांनी हसत जगावे, आनंदी राहावे, बस्स एवढंच…

त्यातील काहींनी तिला हात पुढे केला. तिनेही त्यांना प्रतिसाद देत हसत हसत हस्तांदोलन केले. बसमधील चालकालाही ती हसण्याचा संदेश देत होती. तेवढ्यात सिग्नल संपल्याने गाड्या पुढे जाऊ लागल्या, तशी तिची कारही मेट्रोकडून मरिनलाईन्सकडे गेली. पण सर्वांना हसत राहण्याचा संदेश देऊन गेलेली ती तरूणी कोण होती? हे काही कळले नाही. खरंच ती तरूणी कोण होती?

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन

मुंबई – आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत...
Read More
post-image
महाराष्ट्र

वसई-विरारमध्ये मुसळधार; अनेक रस्ते पाण्याखाली

मुंबई – मुंबई उपनगरासह परिसरात रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी वाहतूककोंडी होण्यासही...
Read More
post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा...
Read More