तीन राज्यांच्या हितासाठी भाजप महाराष्ट्राला अडचणीत आणत आहे – नवाब मलिक – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

तीन राज्यांच्या हितासाठी भाजप महाराष्ट्राला अडचणीत आणत आहे – नवाब मलिक

मुंबई- महाराष्ट्राच्या वाटयाला आलेला कोळसा निवडणूका असलेल्या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांना देण्यात आला असून त्यामुळे राज्याला वीजटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या तीन राज्यांचे हित बघायचे आणि महाराष्ट्राला अडचणीत आणायचे हा भाजपचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.

राज्यात सुरु असलेल्या अघोषित लोडशेडिंगबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये खरपूस समाचार घेतला. त्यांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांचा वीजखात्यामध्ये ठेका असून आणि ऊर्जा खात्यातील चार कंपन्यांचे सल्लागार असलेले विश्वास पाठक यांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे त्यामुळे त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केली.

एक महिन्यापूर्वी राजस्थानमध्ये जवळपास 2500 मेगावॅटचा तुटवडा होता.त्यामुळे तिथे वीजतुटवडा करण्यात आला होता.तीन राज्यामध्ये निवडणूका असताना महाराष्ट्राच्या वाटयाला आलेला कोळसा आहे तो राजस्थान,मध्यप्रदेश,छत्तीसगडला वर्ग करण्यात आलेला आहे. जेणे करुन त्या राज्यामध्ये जी वीजटंचाई आहे त्याच्यावर परिणाम होवू नये निवडणूक असताना तिकडे अखंडीत वीजपुरवठा करता येईल आणि राजस्थान,मध्यप्रदेश छत्तीसगडच्या निवडणूका जिकंण्यासाठी महाराष्ट्राच्याजनतेला अडचणीत आणण्याचा डाव भाजपच्या माध्यमातून सुरु असून त्याचा भुर्दंड महाराष्ट्राला सोसावा लागत असल्याचाही आरोप नवाब मलिक यांनी केला.

32 रेक कोळसा मिळणं अपेक्षित असताना 16 रेक कोळसा मिळतो म्हणजे निम्न रेक कोळसा मिळत नाही. यासाठी सरकारने कधी कोळसामंत्र्याकडे पाठपुरावा केला का? काही ठिकाणी सांगण्यात येते की रेल्वेकडून रेक उपलब्ध होत नाही. रेल्वेविभागाची जबाबदारी पियुष गोयल यांच्याकडेच आहे. म्हणजे एका मंत्र्याने ठरवलं तर सगळं कटकारस्थान करता येते आणि त्यांच्याकडे तीन राज्यांची निवडणूक ही प्राथमिकता आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

2014 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कसा असेल त्याची ब्लूप्रिंट केली होती. त्या विश्वास पाठकांना चारही कंपन्यामध्ये संचालक करण्यात आले. त्यांना सल्लागार पद देवून एनर्जीमंत्री असं पद देण्यात आले आहे. त्यांना एनर्जीमधील काय कळते याचं उत्तर द्यावे.ज माणूस तरुण भारतमध्ये सीईओ म्हणून काम करत होता.जो प्रिटींगप्रेसमध्ये शाई आणि कागद याचं काम करत होता त्याला शाई आणि कागदाचा अभ्यास आहे त्यांना कोळसा आणि वीजचा सल्लागार कसा करण्यात आला त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
राजस्थान,मध्यप्रदेश आणि छत्तीसगडला झुकतं माप देवून महाराष्ट्रावर अन्याय करायचा आणि महाराष्ट्राच्या वाटयाची वीज गुजरातकडून उपलब्ध होत नाही आणि राज्याचे मुख्यमंत्री त्यांना ते विचारु शकत नाही म्हणजे जो भाजपचा कारभार आहे त्यामुळे या राज्यामध्ये वीजटंचाई निर्माण झाली आहे आणि त्याचा फटका लोकांना बसला आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.
होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

अंगणवाडी कर्मचार्‍यांचा आज मुंबईत राज्यव्यापी मोर्चा

मुंबई – केंद्र सरकारने 2011 मध्ये अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनात 1500 व 750 रुपयांची वाढ केली होती. त्या अगोदर 2008 मध्ये 500 व 250 रुपयांची...
Read More
post-image
विदेश

ब्रिटनच्या संसदेत मंगळवारी ‘ब्रेक्झिट’ करारावर मतदान

लंडन – ब्रिटनच्या संसदेत उद्या मंगळवारी ‘ब्रेक्झिट’ करारावर मतदान होणार आहे. हा करार संसदेने फेटाळला तर देशावर मोठे संकट ओढवेल आणि सार्वत्रिक निवडणुका घेण्याची...
Read More
post-image
मुंबई

बेस्टचा बँकांत खडखडाट टाटासाठी 10 टक्के कर्ज काढले

मुंबई – दिवाळी सणासाठी बोनस म्हणून बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी कर्मचार्‍यांना 5500 रुपये सानुग्रह अनुदान घोषित केले होते. दिवाळी उलटून आताशा ख्रिसमस जवळ आला तरी महाव्यवस्थापकांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

डोंबिवलीच्या भोपर गावात पाणीबाणी

डोंबिवली – डोबिवली पूर्वेच्या भोपर गाव परिसरात गेल्या एक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.114 मध्ये असणार्‍या भोपर...
Read More
post-image
News मुंबई

धरण परिसरातील घरगुती, व्यावसायिक पाणी दरात वाढ

मुंबई  – मुंबई पालिकेने आता आपल्या महसूलात वाढ करण्यासाठी धरण परिसरातील घरगुती, व्यावसायिक पाणी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे तसा प्रस्ताव तयार करून...
Read More