तीन तलाकविरोधी विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी – eNavakal
देश राजकीय

तीन तलाकविरोधी विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळानं ‘मुस्लिम महिला (विवाह अधिकारांचं संरक्षण) विधेयक २०१७’ ला म्हणजेच तीन तलाकविरोधी (तलाक ए बिद्दत, ट्रिपल तलाक) विधेयकाला आज मंजुरी दिली आहे. त्यानुसार तोंडी, लिखित अथवा अन्य मार्गांनी दिलेले तीन तलाक  बेकायदेशीर ठरणार आहे. या विधेयकाचा मसुदा संसदेत सादर करण्यात येणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये ते पारित झाल्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल. संसदेचे अधिवेशन सुरू असून त्यात हे विधेयक पारित करून घेण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न असतील.

विधेयकातील तरतुदीनुसार तीन तलाक हा दंडात्मक आणि अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे. तसेच संबंधित व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून तीन तलाकवर विविध स्तरांवर जोरदार चर्चा सुरू होती. तीन तलाक बेकायदा असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं. तसंच केंद्र सरकारनं तीन तलाकविरोधी कायदा तयार करावा, असे निर्देश दिले होते. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांच्या गटानं तयार केला होता. त्यात सुषमा स्वराज, अरुण जेटली, रविशंकर प्रसाद आणि पी. पी. चौधरी यांचा समावेश होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

भारताने उचललेल्या पावलाचे जगभरातून कौतुक – पंतप्रधान

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भारताने कोरोनाचं संकट वेळीच ओळखलं आणि वेळीच योग्य...
Read More
post-image
महाराष्ट्र

इंटरनेट रेडिओ सुरू करणारी नवी मुंबई ही देशातील पहिली महापालिका

नवी मुंबई – कोव्हिड – 19 बाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने विविध माध्यमांचा वापर केला असून आता यामध्ये इंटरनेट रेडिओ या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची गरज नव्हती – शरद पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी ‘दिल्लीमधील निझामुद्दीन येथे पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला...
Read More
post-image
देश

‘हल्दीराम भुजियावाला’चे मालक महेश अग्रवाल यांचे निधन

नवी दिल्ली – शेवेचे छोटेसे दुकान ते हल्दीराम भुजियावाला असा यशस्वी प्रवास करणारे हल्दीराम भुजियावालाचे मालक महेश अग्रवाल यांचे शुक्रवारी मध्यरात्री सिंगापूरमध्ये निधन झाले....
Read More
post-image
महाराष्ट्र

पुणेकरांची चिंता वाढली 18 नवीन रुग्ण आढळले

पुणे – देशात कोरोनाबाधितांचा आकडा रोज फुगत चालला आहे. राज्यात पुणे आणि मुंबईत कोरोनाचे जास्त रुग्ण आहेत. पुण्यात काल 18 नवीन रुग्णांची भर पडली...
Read More