तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस – eNavakal
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या टप्प्यात २३ एप्रिलला राज्यातल्या १४ मतदारसंघांत मतदान होणार आहे. यामध्ये जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, नगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी बारामती, माढा व नगर लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील लढतीसाठी प्रचारसभा घेऊन, प्रचारफेऱ्या काढून जोरदार आरोप-प्रत्यारोप केल्यानंतर आज अखेर २१ एप्रिल रोजी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. बहुचर्चित माढा लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचे संजयमामा शिंदे व महायुतीचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात लढत होणार आहे त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. तर नगरमध्ये शिवसेना-भाजप महायुतीचे डॉ. सुजय विखे-पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांचा परंपरागत मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बरामती मतदारसंघाकडेही सर्वांचे लक्ष आहे कारण येथे दहा वर्षांच्या खासदारकीचा अनुभव असलेल्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात महायुतीच्या कांचन कुल अशी लढत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप! शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांचे भाकित

यवतमाळ – राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण आपला स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधार्‍यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करत आहेत....
Read More