तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांनी मागितली माफी – eNavakal
देश

तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांनी मागितली माफी

बंगळुरू – मोहम्मद अली जिन्नाह यांनी भारताच्या पंतप्रधानपदी असावे अशी महात्मा गांधींची इच्छा होती परंतु जवाहरलाल नेहरूंनी यास नकार दिल्याचे वक्तव्य तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांनी काही दिवसांपूर्वी  केले होते. परंतु आता या वक्तव्यावर दलाई लामा यांनी माफी मागितली आहे. आज बंगळूरूमधल्या रेस कोर्स रोडच्या ताज वेस्ट एंड हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी नेहरू आणि जिन्नाह विषयी केलेल्या वक्तव्यावर जाहीर माफी मागितली.

दलाई लामा यांच्या म्हणण्यानुसार पंडित जवाहरलाल नेहरू यांना पंतप्रधानपद हवेच होते. त्याबद्दल ते एकनिष्ठ होते. तर दुसरीकडे गांधीजींना जिन्नाह यांना पंतप्रधान बनवायचे होते जेणेकरून भारत पाकिस्तान हे दोन्ही देश एकत्र आले असते. अशा शब्दांत दलाई लामा यांनी वक्तव्य केले होते. तसेच नेहरू हे अतिशय हुशार आणि अनुभवी होते परंतु त्यांच्याकडून सुद्धा चूक होणे शक्य आहे असे देखील त्यांनी म्हणले होते. यावर कॉंग्रेसचे वरिष्ठ नेता मनीष तिवारी यांनी दलाई लामांचे वक्तव्य फेटाळून लावत सांगितले की, नेहरू हे एकनिष्ठ होते म्हणून जिन्नाह यांना पंतप्रधानपद देण्यास त्यांनी नकार दिला हे साफ चुकीचे आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

खार परिसरात इमारतीचा काही भाग कोसळला

मुंबई – मुंबईतील खार परिसरात इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. खार पश्चिम येथील जिमखान्याजवळ ही घटना घडली असून ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

एमआयएमकडून मुंबईतील ५ उमेदवारांची यादी जाहीर

औरंगाबाद – एमआयएम पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. एमआयएम ‘वंचित’ आघाडीत सहभागी होईल अशी चर्चा होती. मात्र...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांची माहिती

मुंबई – शिवसेना-भाजपा युतीची चर्चा शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच जागावाटपाबाबत निर्णय होईल, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच युती न...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध

मुंबई – रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे निर्बंध लादण्यात...
Read More