तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक

मुंबई – मध्य, पश्‍चिम, हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून, पश्‍चिम मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान डाऊन जलद लाईनवर आज सकाळी 10.35 वाजल्यापासून ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत जम्बो ब्लॉकचे काम चालणार असल्याचे पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने सांगितले. मध्य मार्गावरील माटुंगा ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यानच्या डाऊन धीम्या लाईनवर सकाळी 11.20 वाजल्यापासून ते दुपारी 3.50 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येईल, अशी घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी-बांद्रा रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी 11.50 वाजल्यापासून ते 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी सर्व लोकल सेवा बंद राहतील, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

आजपासून पुणे परिवहनच्या बसेसचा सीएनजी पुरवठा बंद

पुणे – महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेसना कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी)चा पुरवठा आज 24 मे पासून बंद करण्याचा निर्णय घेतला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

विकिलीक्सच्या असांजेवर आणखी १७ गुन्हे दाखल

वॉशिंटन – अमेरिकेने विकिलीक्सचे प्रकाशक जूलियन असांजेवर गुप्‍त माहिती अधिनियम अतंर्गत 17 नवे आरोप लावले आहेत. अमेरिकेने युकेकडून असांजेच्या प्रत्यापर्णणाची मागणी केली आहे. लंडनच्या बेलमार्श...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गिर्यारोहक अंजली कुलकर्णीचा एव्हरेस्ट शिखरावर मृत्यू

काठमांडू – भारतीय गिर्यारोहक अंजली कुलकर्णीचा एव्हरेस्ट शिखर उतरतांना पाय घसरून मृत्यू झाल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. त्यांचे पती शरद कुलकर्णी देखील त्यांच्या सोबत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई

सीनिअर डॉक्टर्सच्या रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या

मुंबई – वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून मुंबईतल्या नायर रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. पायल सलमान तडवी असं या डॉक्टरचं नाव आहे. ती मूळची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी

नवी दिल्‍ली – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून बलात्काराची धमकी दिली आहे. या ट्विटचा स्क्रीन शॉर्ट शेअर करत अनुरागने...
Read More