तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक – eNavakal
मुंबई राजकीय

तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

मुंबई – मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेवर उद्या सकाळी ११ ते दु. ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा धीम्या मार्गावर, हार्बरवर कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गांवर आणि पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगावपर्यंत धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

पश्चिम रेल्वेवर स. १०.३५ ते दु. ३.३५पर्यंत बोरिवली ते गोरेगावपर्यंत अप आणि डाऊन मार्गांवर ब्लॉक चालणार आहे. या कालावधीत सर्व धीम्या लोकल जलद मार्गावर चालतील. ब्लॉक कालावधीत बोरिवलीतील १,२,३,४ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर लोकल थांबणार आणि सुटणार नाहीत. राममंदिर स्थानकातही लोकल थांबणार नसून, काही फेऱ्या रद्द होणार आहेत.

मध्य रेल्वेवर कल्याणहून निघणाऱ्या सर्व धीम्या लोकल स. 10.37 ते दु. 4 पर्यंत मुलुंड ते माटुंगादरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर ब्लॉक दरम्यान सीएसएमटीच्या दिशेने ये-जा करणाऱ्या लोकल सकाळी 11 ते सायं. 6 वाजेपर्यंत किमान 10 मिनिटे उशिराने धावतील. लोकलप्रमाणेच मेल/एक्स्प्रेस गाड्यादेखील किमान 15 मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशीपर्यंत दोन्ही मार्गांवर स. 11.10  ते संध्या. 4.10 पर्यंत ब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉक दरम्यान सीएसएमटीहून पनवेल-बेलापूर-वाशीसाठी सुटणाऱ्या लोकल स. 10.34 ते दु. 3.39 दरम्यान बंद राहतील. तर पनवेल-बेलापूर-वाशीहून सीएसएमटीच्या दिशेने सुटणाऱ्या लोकल स. 10.21 ते दु. 3.41 पर्यंत खंडीत राहतील. प्रवाशांच्या सुविधेसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलपर्यंत विशेष फेऱ्या चालवल्या जातील.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

भाजप नेते निलेश राणे यांना कोरोनाची लागण

मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रादु्र्भाव वाढत असताना अनेक नेत्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. आता माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनाही कोरोनाची लागण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज नव्या ११ हजार १११ रुग्णांची नोंद

मुंबई – राज्यात आज ११ हजार १११ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर, आज ८ हजार ८३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण...
Read More
post-image
आरोग्य ट्रेंडिंग तंत्रज्ञान

कारणाशिवाय नको कोणत्यातरी कारणासाठी चालत राहा, सर्वेक्षणातून महत्त्वाची बाब समोर

सदृढ शरीरासाठी चालणं हा सर्वांत उत्तम व्यायाम आहे असं म्हटलं जातं. त्यासाठी अनेक फिटनेस फ्रिक रोज सकाळी चालण्याचा व्यायाम करतात. रोज नियमित अर्धा तास...
Read More
post-image
महाराष्ट्र

ऑनलाइन मेळाव्यात राज्यभरातून सुमारे एक लाख महिला सहभागी

मुंबई – महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून तयार केलेले साहित्य व उत्पादनास ॲमेझॉनद्वारे जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचे काम ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कोरोना काळात...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

मुंबईकरांची तहान भागली! सात धरणांमध्ये नऊ महिने पुरेल इतका पाणीसाठा

मुंबई – धरणात मुबलक पाणीसाठा नसल्याने ऐनपावसाळ्यात मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागलं होतं. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांनी तहान भागवणारे...
Read More