तिडी पिंपळगांवच्या आत्महत्याग्रस्त शेतमजुरास आर्थिक मदत  – eNavakal
News महाराष्ट्र

तिडी पिंपळगांवच्या आत्महत्याग्रस्त शेतमजुरास आर्थिक मदत 

परभणी -तिडी पिंपळगाव तालुका सेलू येथील आत्महत्याग्रस्त शेतमजूर  गणेश रावसाहेब आकात यांच्या  कुटूंबाला साेमवार 12 फेब्रुवारी रोजी  शिवसेनेचे जिंतुर विधानसभा प्रमुख तथा परभणी जि.प.चे गटनेते राम पाटील यांच्या वतीने १०हजार रुपये आर्थिक मदत करण्यातआली आहे. शेतमजुर मयत गणेश आकात यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्याने आत्महत्या केल्याने तर घराचा कमविताच गेल्याने संपूर्ण कुटुंबच उघडयावर पडले आहे.
त्याच्या पश्च्यात पत्नी,दाेन मुलं तसेच  वयाेवृध्द आईवडील असा परिवार आहे. जि.प.गटनेते राम पाटील यांनी आपल्या जिंतुर-सेलू मतदार संघातील मयत शेतकरी -शेतमजुर यांना आर्थिक मदत करतात . यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबाला मोठा दिलासा मीळ्तो . यावेळी त्यांच्या समवेत रमेश डख,विठ्ठलराव जाधव,अतुल डख,भागवत जाेगदंड,काशीनाथ घुमरे,भगवान घुमरे,महादेव डाेईजड,रावसाहेब आकात,पिंटू आवटे  आदी  ग्रामस्त उपस्थित हाेते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

लातूरात वाळू तस्करांवर 13 लाखांची दंडात्मक कारवाई

लातूर- मांजरा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू तस्करावर लातूर तहसीलदारांनी कारवाई केली. यामध्ये नऊ वाहने जप्त करीत तब्बल 13 लाखांचा दंड वसूल करण्यात...
Read More
post-image
News देश

तुंगनाथ तीर्थक्षेत्र लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार

रुद्रप्रयाग – रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तृतीय केदार तुंगनाथ तीर्थक्षेत्रही लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार आहे. दरवर्षी याठिकाणी लाखो पर्यटक येतात. यासोबतच क्रौंच पर्वतावरील कार्तिक स्वामींचे मंदिरदेखील झळाळणार...
Read More
post-image
News देश

नवी दिल्ली-चंदिगढ रेल्वे प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार

नवी दिल्ली- देशाची राजधानी नवी दिल्ली आणि पंजाब-हरियाणा राज्यांची राजधानी चंदिगढ यांच्यामधील प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार आहे. या प्रवासाचा फक्त वेळच कमी...
Read More
post-image
News देश

राफेल विमान खरेदी! राहुल गांधी आज करणार नेत्यांशी चर्चा

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चालू असलेले राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. या मुद्यावरुन भाजपाला घेरण्यासाठी आज राहुल गांधी या विषयासंदर्भात...
Read More
post-image
क्रीडा

भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार – श्रीजेश

जकार्ता – आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत भारतीय हॉकी संघाचा कर्णधार श्रीजेशने व्यक्त केले. स्पर्धेपूर्वी आज...
Read More