तिकिट वाटपावरून झालेल्या राड्यानंतर हार्दिक पटेलची राजकोटमधील सभा रद्द – eNavakal
देश राजकीय

तिकिट वाटपावरून झालेल्या राड्यानंतर हार्दिक पटेलची राजकोटमधील सभा रद्द

नवी दिल्ली– गुजरात विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेल आज काँग्रेसला पाठिंबा जाहीर करणार असतानाच काल रात्री तिकिट वाटपावरून सुरतमध्ये काँग्रेस आणि पाटीदार आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांत राडा झाला. या राड्यानंतर राजकोट येथे हार्दिक पटेल यांची आयोजित करण्यात आलेली सभा रद्द करण्यात आली.
गुजरातमध्ये सत्तेवर आल्यास पटेलांना आरक्षण देण्याबाबत काँग्रेस आणि हार्दिक पटेल यांच्या पाटीदार अनामत आंदोलन समितीमध्ये एकमत झाल्याची घोषणा काल करण्यात आली. या आरक्षणाबाबतचे तपशील आणि निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबत पाटीदार अनामत समितीच्या भूमिकेबाबत हार्दिक पटेल सोमवारी राजकोटमधील सभेत घोषणा करतील असे दिनेश भंभानिया यांनी सांगितले होते. मात्र काल रात्री काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी 77 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यातील पटेल उमेदवारांची संख्या पाहून पाटीदार कार्यकर्ते खवळले आणि सुरतमध्ये मोठा राडा झाला. काँग्रेसने आमच्या कोअर कमिटीला विश्वासात न घेताच पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या सदस्यांना तिकिट वाटप केले आहे. काँग्रेसच्या यादीत आम्हाला योग्य प्रतिनिधीत्व मिळालेले नसल्याचे पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. तर भाजपानेच खोटेपणा करून संभ्रम निर्माण करण्यासाठी काँग्रेस उणेदवारांची बनावट यादी सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या राड्याच्या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेल यांना राजकोटमधील सभा रद्द करावी लागली.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

विशेष मागासवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी १५ दिवसात करणार

मुंबई – विशेष मागास प्रवर्गाला महाराष्ट्र शासनाने १९९४ साली २ टक्के आरक्षण दिले आहे. मात्र आजवर शिक्षण व नोकरीत या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
देश

कर्नाटकातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराला अटक

बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना सोमवारी बंगळुरू विमानतळावरून एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बंगळुरूहून मुंबईला येत असताना आयएमए घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई...
Read More
post-image
देश

आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार

नवी दिल्ली – वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आज आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते संपूर्ण भारतातून रात्री उशिरा तीन तास दिसेल. रात्री...
Read More
post-image
महाराष्ट्र

गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीत भाविकांची मांदियाळी

अहमदनगर – आज राज्यभरात गुरूपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लोक विविध प्रकारे आपल्या गुरुंवरील प्रेम व्यक्त करत आहेत. तसेच या दिनानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी...
Read More