‘तारक मेहता…’चे डॉ. हाथी कालवश – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

‘तारक मेहता…’चे डॉ. हाथी कालवश

मुंबई – ‘सोनी सब’ वाहिनीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या सुप्रसिद्ध मालिकेमधील सर्व कलाकार प्रेक्षकांना जिव्हाळ्याचे वाटतात. १० वर्षांपासून सुरू असलेल्या या मालिकेने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. परंतु दु:खदायक बाब म्हणजे चाहत्यांचे लाडके कलाकार डॉ. हंसराज हाथी म्हणजेच कवी कुमार आझाद यांचं आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मीरा रोडच्या वोकहार्ट रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

अभिनेता कवी कुमार आझाद यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत डॉ हंसराज हाथी नामक भूमिका साकारली. त्याचं वजन १२५ किलोपर्यंत वाढल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान देखील केवळ भूमिकेला त्यांची गरज आणि चाहत्यांवरील प्रेमाखातर त्यांनी चित्रिकरण थांबविले नाही. ‘सही बात है’ हा त्यांचा डायलॉग चाहत्यांमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे.

लवकरच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला १० वर्ष पूर्ण होणार होते, परंतु दशपूर्ती पूर्वीच डॉ हाथींचे निधन झाल्यामुळे मालिकेची संपूर्ण टीम आणि चाहत्यांना धक्का बसला आहे.

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

सीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात

नवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम        

अखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

शशांक राव यांच्या संपामागे अदृश्य हात; शिवसेनेचे अनिल परब यांचा आरोप

मुंबई – बेस्टच्या संपात शिवसेनेला बदनाम करण्यासाठी शशांक राव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालविणारे हात अदृश्य होते, असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी...
Read More