तामिळनाडूतील मूर्ती हल्ल्यामागील छुपं राजकारण – eNavakal
रविवार विशेष लेख

तामिळनाडूतील मूर्ती हल्ल्यामागील छुपं राजकारण

प्रकाश गुजर – 

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपाने कम्युनिस्टांची 23 वर्षांची सत्ता उलथून टाकली आणि या विजयाच्या उन्मादात रशियन क्रांतिकारक व्लादिमिर लेनिन यांचा त्रिपुरातील पुतळा भाजप कार्यकर्त्यांनी जेसीबी आणून तोडला. या घटनेचे पडसाद भारतभर उमटले. याच प्रतिसादात तामिळनाडूत पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात करण्यात आली. पेरियार हे तामिळनाडूचे महान नैतृत्व आहे. त्यांच्या बाबतच माहिती ई-नवाकाळ आपल्यासाठी घेऊन आला आहे.

पेरियार यांची माहिती : –

पेरियार यांचे मूळ नाव ईरोड व्यंकटा रामास्वामी होते. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे लोकांनी त्यांना महात्मा म्हणजेच पेरियार असे भूषण दिले. तामिळनाडूच्या जडणघडणीच्या इतिहासात पेरियार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. ते नास्तिक होते आणि उपेक्षित वर्गाचे तारणहार होते, त्यांची राजकीय आणि सामाजिक वाटचाल खाचखळग्यांनी भरलेली होती. पेरियार यांनी 1919 मध्ये गांधीवादी विचारसरणीचे समर्थक म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. ते काँग्रेसचे सदस्य होते. गांधीजींच्या मद्यविरोधी धोरण आणि अस्पृश्यता निवारणसारख्या विचारांनी ते आकर्षित झाले.1919 मध्ये गांधीवादी विचारसरणीचे समर्थक म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. ते काँग्रेसचे सदस्य होते. गांधीजींच्या मद्यविरोधी धोरण आणि अस्पृश्यता निवारणसारख्या विचारांनी ते आकर्षित झाले.

पेरियार असहकार चळवळीतही सहभागी झाले होते. त्यासाठी त्यांना अटकही झाली होती. काँग्रेस पक्षाच्या मद्रास (आताचं चेन्नई) विभागाचे अध्यक्ष होते. मात्र पुढे त्यांच्या काँग्रेस पक्षाशी वाद झाला आणि त्यांनी 1944 साली द्रविड कळगम् हा स्वतःचा पक्ष स्थापना करुन काँग्रेसला रामराम ठोकला. जाती निर्मूलन, बालविवाहाची प्रथा मोडीत निघावी, विधवा महिलांना पुनर्विवाह करता यावा, साथीदार निवडण्याची आणि साथीदाराला सोडण्याची मुभा असावी, लग्न म्हणजे पवित्र बंधन नाही तर सहजीवन असावं, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

फेसबूक वाद :-

त्रिपूरा येथे लेनिनची मूर्ती पाडल्यानंतर भारतीय जनता पर्टीचे सचिव एच राजा यांनी फेसबूक वर एक आक्षेपार्ह्य वक्तव्य केले. यात म्हंटले होते की “त्रिपूरामध्ये ज्याप्रकारे लेनिनची मूर्ती पाडली गेली त्याच प्रकारे एके दिवशी पेरियार यांच्याही मूर्ती तमिळनाडूमध्ये तोडल्या जातील”. या नंतर वादाला तोंड फुटले आणि पेरियार यांच्याही मूर्तीवर हल्ला करण्यात आला.

पेरियार यांच्या बाबत सर्व सामान्यांना माहिती नसलेल्या ९ गोष्टी :-

*ईवीआर रामास्वामी पेरियार चा जन्म १७ सप्टेंबर १८७९ रोजी पश्चिम तामिळनाडूच्या इरोडमध्ये एका हिंदू कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण जास्त नसल्यामुळे ते वडिलांच्या व्यवसायातच काम करु लागले. प्राचीन ग्रंथात लिहीलेल्या पंरपरांना लहानपणापासूनच त्यांनी विरोध दर्शविला.

*बाल विवाह, देवदासी प्रथा, स्त्रीया आणि दलितांवरील अत्याचाराचा त्यांनी विरोध केला होता. त्यांनी हिदू वर्ण व्यवस्थेवर बहिष्कार टाकला होता. १९ वर्षाचे असताना ते विवाह बंधनात अडकले. त्यावेळी त्यांच्या पत्नीचे वय १३ होते.

*१९०४ मध्ये पेरियार यांनी आपल्या वडिलांच्या मित्राला अटक करण्यास पोलिसांना मदत केली होती. या घटनेनंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना बेदम मारले होते. यानंतर पेरियार यांनी घर सोडले आणि काशी येथे गेले.

*पेरियार जेव्हा काशी येथे होते तेव्हा त्यांना एका कार्यक्रमात निःशुल्क जेवण्याची ईच्छा झाली होती. मात्र कार्यक्रमात गेल्या नंतर त्यांना समजले की ते जेवण फक्त ब्राम्हण समाजासाठी होते. त्यांना हे बघून फार वाईट वाटले आणि त्यांनी जातीवादाचा विरोध करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी कधीही कोणत्या धर्माला स्विकारले नाही नेहमी नास्तिक राहिले.

*या नंतर हळू- हळू राजकारणात ते सक्रिय झाले आणि १९१९ मध्ये काँग्रेसचे सदस्य झाले. त्यांनी वाईकॉम आंदोलनाचे नैतृत्व केले. ज्यामध्ये त्यांनी दलितांनाही मंदिरात प्रवेशाची मागणी केली होती. या आंदोलनात त्यांची पत्नी देखील सोबत होत्या.

*काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात ब्राम्हण शिक्षकांकडून गैर-ब्राम्हण विद्यांर्थ्यांबद्दल भेदभाव केल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या घटनेनंतर त्यांनी काँग्रेस नेत्यांसमोरच दलित आणि पिडितांसाठी आरक्षणाची मागणी केली होती मात्र या मागणीला मान्यता देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली.

*पेरियार यांनी दलितांच्या सशक्तीकरणासाठी १९२५ साली आंदोलन सुरु केले. सोवियत रशियाच्या दौऱ्यावर गेल्यावर त्यांना साम्यवादमुळे मिळालेल्या यशाने ते प्रभावित झाले.

*पेरियार यांनी जस्टिस पार्टीची स्थापना केली ज्याचे नेतृत्व त्यांनी स्वतः केले. या नंतर त्यांनी या पार्टीचे नाव बदलून द्रविड कळहम असे ठेवले. १९३७ मध्ये तमिळनाडूमध्ये त्यांनी हिंदी भाषेत शिक्षणाच्या सक्तीला विरोध केला आणि लोकप्रिय झाले. त्यांनी स्वःताला सत्तेच्या राजकारणापासून दूर ठेवले आणि आपले जीवन स्त्रीया आणि दलितांच्या उद्धारासाठी समर्पित केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मराठीत बोलायला सांगितल्याने कुरियर बॉयचा तरुणींवर हल्ला

मुंबई – आज सकाळी 11.30 वाजता दादरच्या न.चिं. केळकर रोडवरील गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या पेडणेकर भगिनींच्या घरी कुरियरवाला आला. या भगिनींनी कुरियरद्वारे स्वामी समर्थांची पुस्तके मागविली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्य प्रदेशात पबजीवर बंदी आणण्याचा विचार

भोपाळ – अलिकडे स्मार्ट मोबाईल फोनवर पबजी खेळ खेळण्याचा जीवघेणा छंद वाढीस लागला आहे. हा खेळ खेळता खेळता अनेकांना त्याचे व्यसन लागत आहे. त्यामुळे तरुणाईला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

‘क्रोकोडाइल हंटर’ स्टीव्ह यांना गुगलची आदरांजली

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध पशूप्रेमी स्टीव्ह इरविन यांची आज 57 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार करून त्यांना मानवंदना दिली आहे. स्टीव्ह इरविन यांना ‘क्रोकोडाइल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना उत्तर प्रदेशात अटक

सहारनपूर – सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथून जैश ए मोहम्मदच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील दहशतवादविरोधी पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. या संशयितांकडून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

प्रियांका-फरहानच्या ‘स्काय इज पिंक’ची तारीख ठरली

मुंबई – अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अभिनेता फरहान अख्तर यांचा आगामी चित्रपट ‘स्काय इज पिंक’ कधी प्रदर्शित होणार याविषयी चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. पण आता...
Read More