तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांचं निधन – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांचं निधन

चेन्नई – तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके प्रमुख करुणानिधी याचं निधन झालं आहे. चेन्नईतील कावेरी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९४व्या वर्षी त्याचं निधन झालं. आपल्या राजकीय कारकिर्दीत तब्बल ५ वेळा त्यांनी तमिळनाडूचं मुख्यमंत्रीपद बजावलं. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावल्याने चेन्नई येथील कावेरी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आल्यापासून रूग्णालयाबाहेर त्यांचे चाहते आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

द्रमुकचे प्रमुख एम. करुणानिधी यांचा राजकीय प्रवास प्रचंड मोठा आहे. आपल्या ९७ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी जवळपास ७८ ते ८० वर्ष राजकारणामध्ये घालवली. करुणानिधी यांचा फक्त तामिळनाडूच नाही तर देशाच्या राजकारणावरही मोठा प्रभाव पाडला. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी हिंदीविरोधात आंदोलन उभारून आपल्या राजकीय कारकीर्दीचा श्रीगणेशा केला होता. समाजातील तळागाळाच्या लोकांसाठी त्यांनी विशेष काम केले. १९६७ मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर १९७१-७६, १९८९-९१, १९९६-२००१ आणि २००६-११ या काळात त्यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

खलिस्तान निर्मितीचा पुरस्कर्ता अटक

मुंबई,  – खलिस्तान निर्मितीचा पुरस्कर्ता असलेल्या एका 45 वर्षांच्या संशयित आरोपीस पुणे एटीएसने अटक केली आहे. त्याचा दहशतवादी कृत्यामध्ये सहभाग असल्याचे काही पुरावे एटीएसच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

चार मराठी चित्रपटांची महिनाभरात 50 ते 60 कोटींची कमाई

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. …आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, नाळ, मुळशी पॅटर्न आणि मुंबई-पुणे-मुंबई 3 या चारही चित्रपटांनी यशाचा चौकार मारला....
Read More
post-image
News मुंबई

पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना मुदतवाढ

मुंबई,- राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना सेवत देण्यात आलेल्या मुदतवाढीचे राज्य सरकारने आज समर्थन केले. त्यांना दिलेली मुदतवाढ ही राज्य आणि केंद्र सरकारने...
Read More
post-image
क्रीडा

बेलेच्या गोलामुळे माद्रिदचा विजय

माद्रिद – स्पॅनिश साखळी फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य रियल माद्रिदने बेलेने नोंदवलेल्या एकमेव गोलांच्या जोरावर शानदार विजय मिळवला. माद्रिदने आपल्या साखळी लढतीत तळाला असलेल्या ह्यूसेका...
Read More
post-image
Uncategoriz

मुंबई विमानतळावरून 24 तासांत तब्बल 1004 विमाने ये-जा झाली

मुंबई – सर्वाधिक वर्दळ असलेला विमानतळ म्हणजे मुंबई विमानतळ. स्वतःचाच विक्रम मुंबई विमानतळाने पुन्हा एकदा मोडीत काढला, 8 डिसेंबरला 24 तासात मुंबई विमानतळावर 1004...
Read More