तानसाची पहिल्या क्रमांकावर झेप – eNavakal
क्रीडा महाराष्ट्र

तानसाची पहिल्या क्रमांकावर झेप

तानसा – अ‍ेम्स स्पोर्टस् आणि फिटनेस ठाणे आयोजित मैदानी अजिंक्यपद स्पर्धा तानसा येथे उत्साहात पार पडल्या. यामध्ये मुंबई मनपा नगरबाह्य धामणगाव, तानसा व मोडकसागरच्या १६८ मुली मैदानी अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धांचे अजिंक्यपद तानसाने १० सायकली जिंकून पटकावले.
स्पर्धांचे उद्घाटन ठाणे जिल्हा अतिरिक्त जिल्हाधिकारी रेवती गायकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ मुंबई, दिवासच्या पिनू गुप्ता, अ‍ेम्स फाऊंडेशनचे अजित कुलकर्णी, तानसा जलविभागाचे सहाय्यक अभियंता चित्रवंशी, दुय्यम अभियंता दिनेश उमावणे, कनिष्ठ पर्यवेक्षक अनिल सनेर हे उपस्थित होते. रोटरी क्लबतर्फे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या मुलींना सायकली बक्षीस म्हणून देण्यात आल्या. ओम्स फाऊंडेशन, ठाणे यांच्यातर्फे सर्व सहभागी १६८ मुलींना नाश्ता, स्कूल बॅग, टी शर्ट, ट्रॅक पॅण्ट, शूज, मेडल, प्रमाणपत्र व  सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
सायकल विजेत्या मुलींची नावे :
तानसा मनपा मराठी शाळा (१० सायकली) – वैशाली खांजोडे, माधुरी रेंजड, नमिता सहारे, सोनाली चौधरी, दीपाली फुफाणे, राणी भोये, वैशाली फुफाणे, मोनाली चौधरी, सानिया जाधव, नंदिनी जाधव.
धामणगाव मनपा शाळा (८ सायकली) – साक्षी लोखंडे, अस्मिता भोईर, दर्शना चिंबडा, अंजली जाधव, वैष्णवी जाधव, रोशनी पवार, तनिशा भोईर, भूमिका गिरी.
मोडकसागर मनपा शाळा (३ सायकली) – पूनम बोंगे, नमिता वळंबा, दीपिका चौधरी. पंच म्हणून प्रशांत, दिलीप अहिनवे, काशिनाथ माळी, एकनाथ वरकुटे व अनिल पाटील यांनी काम पाहिले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण

मँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत.  रोहित शर्माने विश्‍वचषक स्पर्धेतील...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More