…तर पुन्हा 26/11होऊ शकतो! – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

…तर पुन्हा 26/11होऊ शकतो!

मुंबई – 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर लष्कर-ए-तोयेबाचे दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबईतील मुख्य ठिकाणांवरती हल्ला केला होता. त्या हल्ल्यात 164 जणांचा मृत्यू झाला होता तर 308 जण जखमी झाले होते. मात्र या घटनेनंतर मुंबई पोलिसांकडून कोणतीच सुरक्षा वाढवण्यात आली नसल्याचे समोर येत आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई पोलीस कार्यालयाकडे मुंबई सागरी सुरक्षा संदर्भात माहिती मागितली होती. पण ती माहिती मुंबई पोलीस कार्यालयाकडून पुरवण्यात न आल्याने मुंबई पोलीस नौका विभागाला शेख यांनी थेट भेट दिली, त्यावेळी गंभीर बाब समोर आली आहे. शकील अहमद शेख यांच्या मते मुंबई सागरी सुरक्षा दलामध्ये भारी उणिवा आहेत, ज्यामुळे 26/11 सारखी घटना पुन्हा घडू शकते. सागरी सुरक्षेसाठी किती नौका कार्यरत आहेत, किती नौका नव्या रुपात खरेदी केल्या जातील, किती नौका दुरूस्तीच्या निमीत्ताने दुरूस्ती केंद्रामध्ये दाखल करण्यात आल्या आहेत, याची माहिती समोर आली आहे.

26/11 च्या हल्ल्यानंतर मुंबई सागरी सुरक्षेसाठी केंद्र सरकारकडून 23 नौका मुंबई सागरी सुरक्षा दलाला देण्यात आल्या होत्या, त्यापैकी तब्बल 16 नौका मुंबई पोलीस नौका विभाग, लकडा बंदर, दारूखाना, माझगाव, मुंबई या ठिकणी धूळ खात पडल्या आहेत. यापेक्षा अधिक चिंतेची बाब अशी की, सागरी सुरक्षेसाठी 464 कर्मचाऱ्यांच्या दलाची मंजुरी झाली असता, त्यापैकी फक्त 172 कर्मचाऱ्यांचे दल कार्यरत तर 229 कर्मचाऱ्यांची जागा अद्याप तटरक्षक दलाकडून भरण्यात आली नसल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी दिली.

तटरक्षक दलाच्या कर्मचारी वर्गाची आवस्था

एकूण 464 अधिकारी/कर्मचाऱ्यांपैकी 172 अधिकारी/कर्मचारी कार्यरत, 229 जागा रिकामी
एकूण 58 पीएसआय अधिकाऱ्यांपैकी 20 अधिकारी कार्यरत, 28 जागा रिकामी
एकूण 58 वरिष्ठ नौका चालकांपैकी , 12 नौका चालक कार्यरत, 46 जागा रिकामी
एकूण 50 कनिष्ठ नौका चालकांपैकी, 7 नौका चालक कार्यरत, 43 जागा रिकामी
एकूण 52 पीएसआय सारंगपैकी, 6 पीएसआय सारंग कार्यरत, 46 जागा रिकामी
एकूण 246 खलाशांपैकी, 127 खलाशी कार्यरत, 119 जागा रिकामी

या प्रकारची गंभीर माहिती समोर आल्याने मुंबईच्या सागरी तटाची सुरक्षा राम भरोसे असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुन्हा 26/11 सारखी घटना न होण्यासाठी मुंबई सागरी सुरक्षा दलाने लवकरात लवकर यशस्वी प्रयत्न करणे गरजेचे असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांनी दिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
विदेश

जपानमध्ये आणीबाणी लागू होण्याचे संकेत

टोकियो – कोरोनाने जगातील तब्बल 190 देशाला विळखा घातला आहे. त्यातून आर्थिक ताकद असलेला जपानही दूर राहिलेला नाही. तेथे आतापर्यंत 3 हजार 654 जणांना...
Read More
post-image
महाराष्ट्र

जुन्नर तालुक्यातील शेतात गर्भवती महिलेची हत्या

जुन्नर – देशभरातील जनता कोरोनाच्या भीतीच्या छायेत वावरत असताना जुन्नर तालुक्यात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका २२ वर्षीय गर्भवती महिलेची हत्या करून...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्यात सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा

मुंबई – राज्यात विशेषत: मुंबईत सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा होत आहे. राज्यात अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तुंची कमतरता नसून मीठाचा पुरेसा पुरवठा होत आहे....
Read More
post-image
मुंबई

शेअर बाजारात तेजी

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण होत असलेल्या मुंबई शेअर बाजारात आज सकाळपासूनच तेजीचे वातावरण आहे. त्यात बँकांच्या समभागात तेजी आल्यामुळे मुंबई शेअर...
Read More
post-image
महाराष्ट्र

मालेगावातील पावरलूम मालकांवर गुन्हे दाखल

नाशिक – राज्यातच नाही तर नाशिक जिल्ह्यातही सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी असताना मालेगावात अनेक पावरलूम सुरूच होते. मात्र अखेर पाच पॉवरलूम मालकांवर गुन्हे दाखल...
Read More