…तर आंदोलन करणारच; राज ठाकरेंचा सरकारला इशारा – eNavakal
आघाडीच्या बातम्या आंदोलन राजकीय

…तर आंदोलन करणारच; राज ठाकरेंचा सरकारला इशारा

मुंबई – मुंबई आणि उपनगरांमध्ये रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या दुर्घटना यामुळे मनसे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी मनसे स्टाईलने विविध ठिकाणी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी केलेली आंदोलने योग्यच आहे ‘सरकारला खड्डे दिसत नाहीत, निदान आंदोलन तरी दिसेल.’ त्यामुळे येणाऱ्या काळात आंदोलने दिसणारच असा सज्जड इशारा राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.

सायन पनवेल मार्ग खड्डेमुक्त करण्याच्या मागणीसाठी मनसे कार्यकर्त्यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. तसेच अनेक ठिकाणी पडलेले खड्डे आणि खड्ड्यांमुळे होणाऱ्या दुर्घटनांमुळे मनसे कार्यकर्त्यांनी तुर्भे येथे सार्वजनिक बांधकाम विभागाची तोडफोड केली व यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. उद्या कल्याण मनसेतर्फे रस्त्यावरील खड्ड्यांच्या निषेधार्थ ‘चले जाव’ रॅॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना जाहीर समर्थन केल्यामुळे खड्ड्यांच्या विषयावरून मुंबई आणि उपनगरांमध्ये मनसे आक्रमक होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

 

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
Uncategoriz

दिवाळीत साखर स्वस्त होणार

मुंबई – दिवाळीच्या मुहूर्तावर दिवाळ निघत अशी आरडाओरड करणाऱ्या रेशनकार्ड धारकांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. साखर आणि डाळीच्या दरात घट करण्यात आली असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

भविष्य निर्वाह निधी व अन्य योजनांवरील व्याजदरात वाढ

दिल्ली – केंद्र सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अन्य योजनांवरील व्याजदरात ०.४ टक्के इतकी वाढ केली आहे. यामुळे व्याजदर...
Read More
post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१६-१०-२०१८)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: ई नवाकाळ’चे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस – रविंद्र वायकर यांच्यात संघर्ष पेटला

मुंबई –  आरे येथे असलेल्या आदिवासी पाड्यातील जवळपास २ हजार आदीवासींसाठी एसआरएची घरे उपलब्ध करून देत ही घरे किमान ४८० चौरस फुटाचे देण्याची घोषणा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

सलमान ‘भाई’ आणि ‘राणी’ दीपिकाचीच बॉलीवुडवर सत्ता

नवी दिल्ली – स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अहवालानुसार, सप्टेंबर 2017 ते सप्टेंबर 2018 या वर्षात डिजीटल न्यूज चार्टवर सर्वाधिक जास्त सलमान ‘भाई’ आणि ‘राणी पद्मावती’...
Read More