तमाशा कलेची पंढरी राहुट्यांनी सजली   – eNavakal
मनोरंजन महाराष्ट्र

तमाशा कलेची पंढरी राहुट्यांनी सजली  

नारायणगाव- तमाशा’ कलेची पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती असलेल्या नारायणगाव येथे तमाशा मंडळाच्या राहुट्या उभारण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रभरातून यांत्रासाठी आप- आपल्या गावातील गावकारभारी तमाशाची सुपारी देण्यासाठी नारायणगाव येथे येत असल्याने तमाशा फड मालक देखील दरवर्षी येथे जानेवारी महिन्यापासून राहुट्या उभारून तमाशाची करार(बुकिंग) करत असतात.

गावोगावच्या यात्राकमिटीचे पदाधिकारी तमाशाचा कार्यक्रम ठरविण्यासाठी व सुपारी दराचा अंदाज घेण्यासाठी नारायणगावमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. नामवंत मंडळीचा दर लाखांपर्यंत जात आहे. सध्या सर्वत्र यात्रांचा हंगाम सुरू झाल्याने. ग्रामदैवतांच्या यात्रेत तमाशाचे स्थान महत्त्वाचे असल्याने तमाशा कार्यक्रमांमुळे नागरिकांचे व पाहुण्यांचे मनोरंजन तर होतेच शिवाय वगनाट्यापासून प्रबोधनाचा प्रयत्न कलावंत करीत असतात. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्वाधिक करार येथे होऊन कोट्यवधी रुपयांची उलाढाल येथे होत असते कार्यक्रम करार, ठरविण्यासाठी गावोगावच्या पदाधिकाऱ्यांची सध्या येथे गर्दी वाढली असून, आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त करार झाले आहेत. अक्षयतृतीयापर्यंत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा असतात. त्यामुळे तमाशा मंडळांना तोपर्यंत चांगली मागणी असते, यावर्षी रघवीर खेडकर, आनंद लोकनाट्य ,संभाजी जाधवसह शांताबाई जाधव, विठाबाई नारायणगावकर, मंगला बनसोडे, मालती इनामदार, शाहीर संभाजी जाधव, काळू-बाळू, भिका भीमा सांगवीकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, आदी नावाजलेल्या फडमालकांनसह 32 राहुट्या उभारण्यास आल्या आहेत.

एका तमाशा मंडळात जवळपास पन्नास पेशा जास्त कलावंताचा लवाजमा असतो. वाढती महागाई व अधून-मधून होणारी नैसर्गिक आपत्ती यामुळे आर्थिक नियोजन कोलमडते, अशात कलावंताचे मानधन व इतर आवश्यक गरजा पुरविणे जिकिरीचे बनते. याचा विचार लक्षात घेऊन यात्रा कमिट्यांनी सुपारी दराबाबत सहकार्य करावे तसेच तमाशा मंडळाचे रखडलेले अनुदान शासनाने वेळीच देणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा विठाबाई नारायणगावकर या तमाशाचे फडमालक मोहित नारायणगावकर यांनी दैनिक नवाकाळशी बोलताना व्यक्त केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पुलवामा हल्ल्याचा निषेध करत दादरमध्ये व्यापार्‍यांनी काढला मोर्चा

मुंबई – पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत दादरमधील व्यापार्‍यांनी मोर्चा काढून शहिद जवानांना आदरांजली वाहिली. या व्यापार्‍यांनी आज दुकाने बंद ठेऊन दहशतवाद्यांविरोधात जोरदार घोषणा...
Read More
post-image
News देश

हिमाचल प्रदेशमध्ये हिमस्खलन एक जवान शहीद! 5 बेपत्ता

शिमला- हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यात हिमस्खलन झाले असून लष्कराचे सहा जवान बर्फाच्या ढिगार्‍याखाली अडकले आहेत. यातील एका जवानाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून अद्याप...
Read More
post-image
News देश

तामिळनाडूत द्रमुक-काँग्रेसची युती

चेन्नई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज तामिळनाडूमध्ये काँग्रेस आणि द्रविड मुन्नेत्र कळघम यांची आघाडी जाहीर झाली. दोन्ही पक्षात जागावाटप झाले आहे. काँग्रेस तामिळनाडूमध्ये 9,...
Read More
post-image
News मुंबई

फडणवीसांच्या स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

मुंबई – शिवसेना- भाजपाच्या दिलजमाईनंतर आता दोन्ही पक्षांच्या आमदारांसाठी एकत्रित स्नेहभोजनाचा जंगी बेत आखण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी हे...
Read More
post-image
News महाराष्ट्र

दहशतवाद संपविण्यात भाजप सरकार अपयशी! शरद पवारांची मोदींवर टीका

नांदेड – पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली ती योग्य नव्हती. दहशतवाद संपविण्यात भाजप सरकार अपयशी ठरले, अशी घणाघाती टीका...
Read More