तब्बल ६ किलो ८२० ग्रॅम गांजा जप्त,दोन ठिकाणी पोलीस उपायुक्तांची कारवाई – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र

तब्बल ६ किलो ८२० ग्रॅम गांजा जप्त,दोन ठिकाणी पोलीस उपायुक्तांची कारवाई

  1. अमरावती – पोलिसांनी सापळा रचून शहरातील दोन ठिकाणाहून तब्बल ६ किलो ८२० ग्रॅम गांजा जप्त केला. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात पोलिसांनी बुधवारी रात्री नागपुरी गेट हद्दीत तसेच छत्री तलाव ते दस्तुरनगर मार्गावर धाडसत्र राबविले.
पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, एपीआय पवार तसेच १७ पोलिसांच्या ताफ्याने हैदरपुºयातील जुगार अड्ड्यावर धाड टाकली. मात्र, जुगारी पसार झाल्याने पोलिसांच्या हाती काही लागले नाही. याचवेळी पोलिसांनी हैदरपुºयातील रजियाबी शेख हुसैन (६०) या महिलेच्या घरी धाड टाकली. पोलिसांनी महिलेस अटक करून ६९० ग्रॅम गांजा जप्त केला. नागपुरी गेट पोलिसांनी पुढील चौकशी सुरू करून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.
नागपूरच्या आरोपीला अटक
अमरावती : गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक साबीर शेख यांच्या पोलीस पथकाने छत्री तलाव ते दस्तुरनगर दरम्यान सुपर एक्स्प्रेस हायवेवरील खदानीजवळ नाकाबंदी केली. यावेळी पळून जात असलेल्या आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. सुनील जयंतीलाल पोपट (५३,रा. एनआयटी कॉम्पलेक्स, नंदनवन, नागपूर) असे त्याचे नाव असून, त्याच्याजवळून ४१ हजार ९३० रुपये किमतीचा ५ किलो ९९० गॅॅ्रमचा गांजा जप्त केला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम २०, २२, एनडीपीएस अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. प्रकरण राजापेठ पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

सोन्याच्या दरात ऐतिहासिक वाढ

मुंबई – आज सोन्याच्या दरात ऐतिहासिक वाढ झाली असून सोन्याने ३४ हजार ७०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या दराने आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचा १९ वर्षांपूर्वीचा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

त्रालमध्ये चकमक! एका दहशतवाद्याला कंठस्नान

त्राल – जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरू आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका रुग्णालयांना होणारा औषध पुरवठा आजपासून बंद

मुंबई – आजपासून मुंबईतील पालिकेच्या रुग्णालयांना होणारा औषधपुरवठा बंद होणार आहे. त्यामुळे रुग्णांना हाल सोसावे लागणार आहेत. ऑल फूड अॅण्ड लायसन्स होल्डर फाऊंडेशनने महापालिकेच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ भारत दौऱ्यावर! पंतप्रधानांची घेतली भेट

नवी दिल्ली – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ हे तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी...
Read More
post-image
महाराष्ट्र

इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून भिवंडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडी – ३० वर्ष जुन्या इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीच्या पद्मानगर भागात घडली आहे. गंगाजमुना या दुमजली इमारतीतील...
Read More