तबलिगी जमात प्रकरणी ईडीची मुंबईत छापेमारी – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

तबलिगी जमात प्रकरणी ईडीची मुंबईत छापेमारी

मुंबई- तबलिगी जमातशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. आज मुंबईतील अंधेरी, एस.व्ही. रोडसह एकूण चार ठिकाणी ईडीकडून छापे टाकण्यात आले. ईडीने केलेल्या छापेमारीत कोणती महत्वाची माहिती, कागदपत्रे हाती लागली याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही.

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर तबलिगी जमात चर्चेत आली होती. दिल्लीत धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवल्याचा आरोप या संघटनेवर करण्यात आला होता. या कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि कोरोनाचा फैलाव करणाऱ्या दिल्लीमधील निजामुद्दीन मरकझचे प्रमुख मौलाना साद यांच्याविरोधात पोलिसांनी 17 एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर मौलाना साद फरार झाले होते. पैश्यांच्या अफरातफरी प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणी कारवाईला वेग आला असून मुंबईतही ईडीकडून छापेमारी सुरु करण्यात आली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

तबलिगी जमात प्रकरणी ईडीची मुंबईत छापेमारी

मुंबई- तबलिगी जमातशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. आज मुंबईतील अंधेरी, एस.व्ही. रोडसह एकूण चार ठिकाणी ईडीकडून छापे...
Read More
post-image
देश राजकीय

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर! प्रकृती खालावली, फुप्फुसाला संसर्ग

नवी दिल्ली – भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे कोरोनावर उपचार घेत असतानाच त्यांची प्रकृती झपाट्याने खालावत चालली आहे. आधी त्यांच्या मेंदूत गाठ झाल्याने...
Read More
post-image
देश वाहतूक हवामान

दिल्लीत पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीसह नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्राम या परिसरात आज सकाळी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी नोएडा,...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

‘वडाळ्याच्या राजा’ला मंडप उभारण्यास परवानगी देण्यापूर्वी रहिवाशांचे म्हणणे ऐकून घ्या!

मुंबई – मुंबईतील ‘वडाळ्याच्या राजा’ला गणेशोत्सवासाठी मंडप बांधण्यास परवानगी देण्यापूर्वी वडाळ्यातील दोन इमारतीमधील रहिवाशांच्या अडचणी व तक्रारी ऐकून घ्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे...
Read More
post-image
महाराष्ट्र वाहतूक

महाड-भोर महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू

रायगड – कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महाड-भोरमार्गे पंढरपूर महामार्ग दरड कोसळल्याने वाहतुकीस बंद केला होता. त्यामुळे ऐन गणेशोत्सव काळात येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले...
Read More