ढेबेवाडीत बारावीत शिकणार्‍या विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या – eNavakal
News गुन्हे

ढेबेवाडीत बारावीत शिकणार्‍या विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या

ढेबेवाडी- बारावीतील विद्यार्थिनीचा गळा चिरून खून झाल्याची घटना आज सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली. करपेवाडी येथे ही घटना घडली. भाग्यश्री संतोष माने (17) असे संबधित युवतीचे नाव आहे.
भाग्यश्री माने तळमावले येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात शिकत होती. आज ती नेहमीप्रमाणे सकाळी कॉलेजला जाते, असे सांगून घरातून गेली. मात्र, कॉलेज सुटल्यानंतर नेहमीच्या वेळेत ती घरी परतली नाही. त्यानंतर मात्र नातेवाईकांनी तिची चौकशी सुरू केली. तिच्या मैत्रीणी, महाविद्यालय, संबधित आप्तेष्ट यांच्याकडे त्यांनी चौकशी केली. मात्र, तिचा शोध लागला नाही. ती ज्या मार्गाने जाते ती शेतातील पायवाट आहे. ती करपेवाडीतून थेट तळमावलेत येते. त्या मार्गावर भाग्यश्रीची आई व आजीने शोधाशोध सुरू केला. त्यावेळी करपेवाडीनजीकच्या शेतातील रस्त्यात तिचा मृतदेह सापडला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

खार परिसरात इमारतीचा काही भाग कोसळला

मुंबई – मुंबईतील खार परिसरात इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. खार पश्चिम येथील जिमखान्याजवळ ही घटना घडली असून ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

एमआयएमकडून मुंबईतील ५ उमेदवारांची यादी जाहीर

औरंगाबाद – एमआयएम पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. एमआयएम ‘वंचित’ आघाडीत सहभागी होईल अशी चर्चा होती. मात्र...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांची माहिती

मुंबई – शिवसेना-भाजपा युतीची चर्चा शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच जागावाटपाबाबत निर्णय होईल, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच युती न...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध

मुंबई – रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे निर्बंध लादण्यात...
Read More