ढाई अक्षर प्रेम के लवकरच रंगभूमीवर – eNavakal
जीवनशैली मुंबई

ढाई अक्षर प्रेम के लवकरच रंगभूमीवर

मुंबई : वैयक्तिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना एकटेपणा पसंत करणारा माणूस हा स्वतंत्र होतो आहे का ? की एकटा पडतो आहे ? हा मानसशास्त्रीय प्रश्न मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. ज्येष्ठ साहित्यिक व. पु. काळे यांनी त्यांच्या ‘तू भ्रमत आहासी वाया’ या कादंबरीत या प्रश्नांचा काळाच्या पुढे जाऊन विचार केला आहे. या प्रश्नाचं चिंतन करताना या सगळ्या प्रश्नांचं उत्तर माणसाने स्वतःच्या गरजा नेमक्या किती आणि कोणत्या आहेत त्या ओळखणं आणि स्वतःला आणि नातेसंबंधांना जास्तीत जास्त डोळस वेळ देणं ही माणसाच्या सुखी आणि आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली ठरू शकते असा विचार व. पु. काळे मांडतात. आपल्याकडे नसलेल्या गोष्टींच्या मागे धावण्यापेक्षा असलेल्या गोष्टींचा आनंद घेणे यातूनच सुख सापडू शकते. मोठ्या अर्थाने प्रेम आणि त्यापुढे जाऊन भक्ती हे माणसाच्या जीवनाचे साध्य आहे हा या कादंबरीत सहजपणे आलेला विचार अत्यंत खुसखुशीत आणि खुमासदार पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न ‘ढाई अक्षर प्रेम के‘ या नाटकात करण्यात आलेला आहे. जीवनविषयक तत्वज्ञान असले तरी छोट्या छोट्या उदाहरणांतून आणि मनोरंजक संवादातून हे नाटक आपल्याला विचार करायला लावेल असं हे नाटक असणार आहे. निर्माती मुक्ता बर्वे यांची ‘छापा काटा’, ‘लव्हबर्ड्स’, कोड मंंत्र’ या नाटकानंतरची ही चौथी नाट्यनिर्मिती असणार आहे. मुक्ता बर्वे यांच्याच ‘दीपस्तंभ’, ‘कोड मंत्र’ या नाटकांतून अभिनय करणार्‍या अभिनेत्री सुजाता मराठे या नाटकाद्वारे प्रथमच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. ‘तू भ्रमत आहासी वाया’ या कादंबरीचं नाट्यरुपांतर दिग्पाल लांजेकर यांनी केलं असून नाटकाचं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकरच करणार आहेत. पुण्यातून अनेक हौशी व प्रायोगिक नाटकं करणारे दिग्पाल लांजेकरांचं हे पहिलंच व्यावसायिक नाटक असणार आहे. ‘कोड मंत्र‘ या नाटकात कर्नल निंबाळकरांची भूमिका करणारे अजय पूरकर ढाई अक्षर प्रेम के नाटकात प्रमुख भूमिकेत असणार आहेत. रुद्रम मालिकेत छोटीशी भूमिका साकारणारी तरीही लक्षात राहिलेली किरण खोजे या नाटकात अजय पूरकर सोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अंबिका + रसिका निर्मित, साईसाक्षी प्रकाशित व. पु. काळे यांच्या ‘तू भ्रमत आहासी वाया’ या कादंबरीवर आधारित ‘ढाई अक्षर प्रेम के’ हे नाटक डिसेंबरमधे व्यावसायिक रंगभूमीवर येत आहे. आजकालच्या धावपळीच्या युगात माणसांवरचा तणाव वाढतो आहे. तणावांचा परिणाम वैयक्तिक नातेसंबंधांवर होताना दिसत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

चार मराठी चित्रपटांची महिनाभरात 50 ते 60 कोटींची कमाई

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. …आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, नाळ, मुळशी पॅटर्न आणि मुंबई-पुणे-मुंबई 3 या चारही चित्रपटांनी यशाचा चौकार मारला....
Read More
post-image
News मुंबई

पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना मुदतवाढ

मुंबई,- राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना सेवत देण्यात आलेल्या मुदतवाढीचे राज्य सरकारने आज समर्थन केले. त्यांना दिलेली मुदतवाढ ही राज्य आणि केंद्र सरकारने...
Read More
post-image
क्रीडा

बेलेच्या गोलामुळे माद्रिदचा विजय

माद्रिद – स्पॅनिश साखळी फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य रियल माद्रिदने बेलेने नोंदवलेल्या एकमेव गोलांच्या जोरावर शानदार विजय मिळवला. माद्रिदने आपल्या साखळी लढतीत तळाला असलेल्या ह्यूसेका...
Read More
post-image
Uncategoriz

मुंबई विमानतळावरून 24 तासांत तब्बल 1004 विमाने ये-जा झाली

मुंबई – सर्वाधिक वर्दळ असलेला विमानतळ म्हणजे मुंबई विमानतळ. स्वतःचाच विक्रम मुंबई विमानतळाने पुन्हा एकदा मोडीत काढला, 8 डिसेंबरला 24 तासात मुंबई विमानतळावर 1004...
Read More
post-image
News देश

आरबीआयच्या निधीचा वापर करणे ही देशविरोधी कृती

नवी दिल्ली- उर्जित पटेल आरबीआयला वाचवण्याचा प्रयत्न करत होते म्हणून त्यांनी राजीनामा दिला. आपली कातडी वाचवण्यासाठी आरबीआयच्या राखीव निधीचा वापर करणे ही देशविरोधी कृती असल्याचे...
Read More