डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले कलामंदीर बंद – eNavakal
News महाराष्ट्र

डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले कलामंदीर बंद

डोंबिवली – वर्षभरापासून नुतनीकरणासाठी बंद असलेल्या कलेच्या आचार्य अत्रे नाट्यगृहा पाठोपाठ आता डोंबिवलीचे सावित्रीबाई फुले कलामंदिरातील तिसरी घंटा बंद झाली आहे, वारंवार नादुरूस्त होणाऱ्या वातानुकूलित यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले कला मंदिर बंद करुन आता नवीन तंत्रज्ञान असलेली यांत्रणा बसविण्यात येणार आहे.

सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या कल्याण-डोंबिवलीत मनोरंजन व सांस्कृतिक चळवळीचे हक्काचे ठिकाण बंद झाल्याने नाट्य व कलेच्या रसिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सांस्कृतिक नगरीतील सावित्रीबाई फुले कलामंदिर एमआयडीसी भागात आहे. या परिसरातील रासायनिक कंपन्यांकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा वारंवार नादुरुस्त होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे आता कल्याणच्या अत्रे नाट्यगृहाच्या धर्तीवर  चिलिंग प्लांट पध्दतीची वअधिक क्षमतेची डोंबिवलीच्या सावित्रीबाई कलामंदिरातही वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात येणार आहे. यासाठी तीन महिने लागणार असल्याने दसरा व दिवाळी सुट्टीतही डोंबिवलीकर रसिकांना सांस्कृतिक उपवास घडणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

राफेलच्या पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने राफेल कराराबाबत दाखल झालेल्या पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

सबरीमाला मंदिर प्रवेशाचा निर्णय सात न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होणार

नवी दिल्ली – नवी दिल्ली – ऐतिहासिक सबरीमाला प्रकरणावरील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात ३ विरुद्ध २ च्या बहुमताने सात न्यायमूर्तींच्या संविधान पीठाकडे पाठविण्यात आली आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, राजकारण आमच्यासाठी धंदा नाही – संजय राऊत

मुंबई – ‘छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात शब्दाला किंमत आहे. आमची वृत्ती व्यापारी नाही,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

#HappyChildrensDay दारातून डोकावणारी ‘ती’ आज वर्गात बसून शिकतेय

हैदराबाद – असे म्हणतात की, ‘एक फोटो हा हजारो शब्दांसमान असतो.’ अशीच कमाल हैदराबादमधील एका छायाचित्रकाराने टिपलेल्या फोटोने केली आहे. दाराबाहेर उभी राहून वर्गात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

संजय राऊत म्हणतात…’अब हारना और डरना मना है’

मुंबई – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सत्तास्थापनेच्या हालचाली प्रचंड वेगाने सुरू आहेत. शिवसेनेकडून ‘पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच’, अशी घोषणा...
Read More