डोंबिवली मोबाईल चोरी विरोधी पथकाची कारवाई – eNavakal
News गुन्हे मुंबई

डोंबिवली मोबाईल चोरी विरोधी पथकाची कारवाई

कल्याण – वाढत्या मोबाईल चोरीच्या घटनाचा तपास करत गुन्हेगारांना गजाआड करण्यासाठी अप्पर पोलीस आयुक्त डॉ प्रतापराव दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापण करण्यात आलेल्या मोबाईल विरोधी पथकाने 20 गुन्हे उघडकीस आणले असून यामधील 19 आरोपीना अटक करत 21 मोबाईल आणि त्यांच्या जवळील मोटार सायकल ही जप्त करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी कल्याण, डोंबिवलीसह जवळपासच्या परिसरातून गहाळ झालेले 150 मोबाईल हस्तगत करण्यात या पथकाला यश आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कल्याण डोंबिवली सह जवळपासच्या परिसरात मोबाईल चोरीच्या घटना वाढीस लागल्या होत्या. लागोपाठ घडणाऱ्या या घटनेमुळे पोलीस यंत्रणा चक्रावली होती. या आरोपींचा शोध घेत या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अप्पर पोलीस आयुक्त डॉ प्रतापराव दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अधिपत्याखाली कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या परिसरात मोबाईल विरोधी पथक स्थापन करण्यात आले. या मधील डोंबिवली येथील पथकाने डोंबिवली, मानपाडा, विष्णूनगर, टिळकनगर या पोलीस स्थानकात दाखल झालेल्या मोबाईल चोरी व मोबाईल गहाळ झालेल्या घटनांचा तपास करत 20 गुन्हे उघडकीस आणत या गुन्ह्यांमध्ये चोरी केले एकूण 1 लाख 83 हजार 900 रुपये किमतीचे एकूण 21 मोबाईल व 10 आरोपीना अटक केली आहे. तसेच या गुन्ह्यांमध्ये आरोपी वापरत असलेली एक दुचाकी ही पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच गहाळ झालेले 20 लाख 99 हजार 500 रुपये किमतीचे एकूण 150 मोबाईल मिळवण्यात या पथकाला यश आले आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सहाययक पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अप्पर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर, पोलीस उपायुक्त संजय शिंदे, सहाययक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन एम पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मोरे, पोलीस नाईक एन एस अभंग, पोलीस नाईक डी पी साळवी, सी एस पठारे, पोलीस शिपाई डी एच लोखंडे यांनी केली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
लेख

वत्तविहार : मराठीचा न्यूनगंड कायम

महाराष्ट्र सरकारला आपल्याच मातृभाषेचे महत्त्व समजत नसेल तर या सरकारच्या बुध्दीची जेवढी कीव करावी तेवढी थोडीच आहे. विशेषतः शिक्षण विभागाने मराठीबाबत जो काही खेळखंडोबा...
Read More
post-image
देश

भारतीय रेल्वेचे खासगीकरण होणार! सुरुवात ‘आयआरसीटीसी’पासून

नवी दिल्ली – भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या पाच ‘रेल्वे सेवांपैकी’ एक आहे. मोदी सरकारने भारतीय रेल्वेचे आता खाजगीकरण करायचे ठरविले आहे. कमी गर्दीच्या आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार! मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई – नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असून या प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, मुरुडसह 40 गावांमधील ग्रामस्थांचा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सावजी हॉटेलना मिळणार दारूचा परवाना

नागपूर – नागपूर येथील प्रसिद्ध सावजी हॉटेलांमध्ये व धाब्यांवर दारू विकण्यास उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली आहे. यामुळे आता नागपुरात कायदेशीरपणे मद्यविक्री केली जाईल....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पवईत हॉटेलला आग; अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी

मुंबई – पवईतील हिरानंदानी परिसरात हॉटेलला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. देव कोरडकर असे या कर्मचाऱ्याचे नाव असून...
Read More