डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या ठाकुर्ली रेल्वे उड्डान पूलाचे काम अंतिम टप्प्यात – eNavakal
News मुंबई राजकीय

डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या ठाकुर्ली रेल्वे उड्डान पूलाचे काम अंतिम टप्प्यात

डोबिवली-ठाकुर्ली पूर्व पश्चिम जोडणार्या रेल्वे उड्डान पूलाचे काम अंतिम टप्प्यात आला असून येत्या काही दिवसात हे काम  पूर्ण होईल व एप्रिलमध्ये या पूलाचे लोकार्पण होणार आहे. डोंबिवली पश्चिम भागात जाण्यासाठी रामनगर येथे एकमेव रेल्वे  उडडाणपूल आहे.

ठाकुर्ली रेल्वे क्रोसिंग वर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पश्चिमेतील बावनचाळकडून पूर्वेतिल स.वा जोशी हायस्कूल येथे उडडाण पूल बांधण्याचे शिवसेनेने कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीत वचन दिले होते.या संदर्भात प्रस्ताव २०१३ मध्ये सभागृहात मंजूर झाला होता .त्या वचननाम्याची आता पूर्तता होत असून आज दुपारी या पूलाची महापौर राजेंद्र देवळेकर, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, शहरप्रमुख राजेश मोरे यांच्यासह रेल्वेचे अधिकारी पाटील, महापालिकेचे अधिकरी नेमाडे व मयेकर यांनी पाहणी केली. शहरप्रमुख राजेश मोरे म्हणाले, पूलाचे काम अंतिम टप्प्यात असून काही किरकोळ कामे शिल्लक असून ही कामे येत्या काही दिवसात होतील व साधारण एप्रिलमध्ये हा पूल वाहतूकीसाठी खुला होईल असेही त्यानी सांगितले. पूलाचे डांबरीकरण करणे, विजेचे खांब बसवणे, बारा बंगला भागातील सुमारे ३०० मीटरचा रस्ता करणे अशी कामे अजून चालू आहेत. आता केवळ १० ते १५ टक्के काम शिल्लक असल्याचे मोरे यांनी सांगितले. या पूलामुळे रामनगर येथे होणारी वाहतूक कोंडी पुष्कळ कमी होणार असून पश्चिमेतील वाहनांसाठी परस्पर ठाकुर्ली मार्गे कल्याणला जाणे शक्य होणार आहे. ज्यामुळे डोंबिवली पुर्व पश्चिमेतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. याशिवाय शहरातील वाहने परस्पर ठाकुर्ली मार्गे पश्चिमेला जाणार असल्याने  शहरातील वाहतूक सुरळीत होणार आहे. रेल्वे प्रशासन पन्नास व महापालिका यांनी पंन्नास टक्के खर्च  केले आहे. या पुलामुळे ठाकुर्ली येथील फाटक बंद होणार असून रेल्वेला जो खोलंबा होतो तो आता टळणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या आंदोलन महाराष्ट्र

12 डिसेंबर रोजी माथाडी कामगारांचे राज्यभरात मूक मोर्चे

मुंबई – राज्य सरकारने माथाडी कामगारांच्या हिताविरोधात काही जाचक शासन निर्णय घेतले आहेत. काहींचे अध्यादेश काढले आहेत. सरकारच्या या धोरणामुळे सोयीनुसार माथाडी कायद्याची तोडफोड...
Read More
post-image
महाराष्ट्र

अंगणवाडी कर्मचार्‍यांचा आज मुंबईत राज्यव्यापी मोर्चा

मुंबई – केंद्र सरकारने 2011 मध्ये अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनात 1500 व 750 रुपयांची वाढ केली होती. त्या अगोदर 2008 मध्ये 500 व 250 रुपयांची...
Read More
post-image
विदेश

ब्रिटनच्या संसदेत मंगळवारी ‘ब्रेक्झिट’ करारावर मतदान

लंडन – ब्रिटनच्या संसदेत उद्या मंगळवारी ‘ब्रेक्झिट’ करारावर मतदान होणार आहे. हा करार संसदेने फेटाळला तर देशावर मोठे संकट ओढवेल आणि सार्वत्रिक निवडणुका घेण्याची...
Read More
post-image
मुंबई

बेस्टचा बँकांत खडखडाट टाटासाठी 10 टक्के कर्ज काढले

मुंबई – दिवाळी सणासाठी बोनस म्हणून बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी कर्मचार्‍यांना 5500 रुपये सानुग्रह अनुदान घोषित केले होते. दिवाळी उलटून आताशा ख्रिसमस जवळ आला तरी महाव्यवस्थापकांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

डोंबिवलीच्या भोपर गावात पाणीबाणी

डोंबिवली – डोबिवली पूर्वेच्या भोपर गाव परिसरात गेल्या एक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.114 मध्ये असणार्‍या भोपर...
Read More