डोंबिवली कामगार वसाहतीमधील आगीत एकाचा मृत्यू, १ जखमी – eNavakal
News अपघात महाराष्ट्र

डोंबिवली कामगार वसाहतीमधील आगीत एकाचा मृत्यू, १ जखमी

डोंबिवली-रुणवालच्या माय सिटी गृहप्रकल्पाच्या फेज-२ मध्ये कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या वसाहतीला आज पहाटे आग लागली. त्यात कामगारांची १२० घरे जळून खाक झाली. यात एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला तर अन्य १ कामगार जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले असून आता तेथे कूलिंगचे काम सुरू आहे, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
बांधकाम सुरू असलेल्या रुणवालच्या माय सिटी गृहप्रकल्पातील कामगारांसाठी येथे वसाहत तयार करण्यात आली आहे. त्यात १२० खोल्या उभारण्यात आल्या होत्या. तेथे १७२ कामगार राहत होते. आज सकाळी वसाहतीला अचानक आग लागली. तेव्हा जीव वाचवण्यासाठी कामगारांनी घरातून पळ काढला. परंतु एका कामगाराचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आणखी एक कामगार यात जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथील १७० कामगारांना वाचवण्यात यश आले आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाच्या जवानांनी व्यक्त केला आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
News अपघात महाराष्ट्र

डोंबिवली कामगार वसाहतीमधील आगीत एकाचा मृत्यू, १ जखमी

डोंबिवली-रुणवालच्या माय सिटी गृहप्रकल्पाच्या फेज-२ मध्ये कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या वसाहतीला आज पहाटे आग लागली. त्यात कामगारांची १२० घरे जळून खाक झाली. यात एका कामगाराचा...
Read More
post-image
News देश

केंद्रशासित दिव, दमण वीज वितरण खासगीकरणात टोरंटची सर्वाधिक बोली

अहमदाबाद- दिव, दमण, दादरा, नगर, हवेली या केंद्रशासित प्रदेशाच्या खासगी वीज वितरणासाठी गुजराथच्या टोरंट पॉवर लिमिटेडने ५१ टक्क्यांच्या समभागांसाठी सर्वाधिक बोली लावली आहे. केंद्र...
Read More
post-image
News मुंबई राजकीय

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा फोन टॅप होत असल्याचा दावा

मुंबई – राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा त्यांचा फोन टॅप केला जात असल्याचे म्हटले आहे. त्यांनी स्वतःच केलेल्या या दाव्यामुळे राज्यात पुन्हा...
Read More
post-image
News कोरोना महाराष्ट्र

सातारा जिह्यात नवा कोरोना विषाणू माण ,खटाव ,कोरेगाव तालुके हॉटस्पॉट

सातारा – राज्यातील सातारा जिल्हयात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये पुन्हा झपाट्याने वाढताना दिसत असून याठिकाणी कोरोनाची नवी प्रजाती आढळलेली आहे.याठिकाणी एका कोरोना रुग्णामध्ये नवे म्युटेशन्श आढळल्यामुळे प्रशासन सतर्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

अखेर आज ठरणार ‘बिग बॉस १४’चा विजेता

मुंबई – छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय आणि वादग्रस्त शो ‘बिग बॉस’चा चौदावा सीजन सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आज या सिजनचा ग्रँड फिनाले...
Read More