डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाची जागा बळकावल्याप्रकरणी डोंबिवलीत गुन्हा दाखल – eNavakal
गुन्हे मुंबई

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाची जागा बळकावल्याप्रकरणी डोंबिवलीत गुन्हा दाखल

कल्याण – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र यशवंत आंबेडकर यांची डोंबिवली गोळवली नजीक जमीन होती. ही जमीन त्यांची असल्याचे माहीत असताना देखील एका इसमाने त्यांची कोणतीही परवानगी न घेता त्या जागेवर तीन मजली इमारत उभारली. याप्रकरणी यशवंत आंबेडकर यांचे पुत्र भीमराव आंबेडकर यांनी डोंबिवली मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी सुरेंद्र पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
डोंबिवली पूर्वेकडील गोळवली परिसरात सर्वे नंबर 69 भूमापन क्र 8 ह येथील प्लॉट नंबर 13 (अ),प्लॉट नंबर 11 व प्लॉट 5 हा भूखंड डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र यशवंत भीमराव आंबेडकर यांच्या नावाने आहे. हा भूखंड त्यांच्या मालकीचा आहे हे माहीत असताना देखील ठाकुर्ली येथे राहणार्‍या सुरेंद्र पाटील नावाच्या इसमाने डॉ. आंबेडकरांच्या कुटुंबीयांची कोणतीही परवानगी न घेता भूखंडाचा ताबा घेत त्यावर तीन मजली इमारत बांधली, असा आरोप करीत याप्रकरणी यशवंत भीमराव आंबेडकर यांचे पुत्र भीमराव आंबेडकर यांनी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून, या तक्रारीनुसार पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण

मँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत.  रोहित शर्माने विश्‍वचषक स्पर्धेतील...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More