डॉ. झाकीर नाईकला हायकोर्टाचा झटका – eNavakal
News देश

डॉ. झाकीर नाईकला हायकोर्टाचा झटका

मुंबई – मुस्लीम तरूणांना दहशतवादी कृत्य करण्यासाठी प्रेरणा देणारा वादग्रस्त इस्लामी झाकीर नाईकला उच्च न्यायालयाने आज चांगलाच झटका दिला. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तसेच ईडी सुरू केलेल्या चाशीला सामोरे न जाता आपल्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रा आव्हान देण्या बरोबरच आपल्या विरोधातील सर्व कागद पत्रे न्यायालयात सादर करण्याची विनंती करणारी याचिका न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली.

मुस्लीम तरूणांना दहशतवादी कृत्य करण्यासाठी प्रेरणा देणारा वादग्रस्त इस्लामी झाकीर नाईक याच्या विरोधात केंद्र सरकारने त्याच्या विरोधात कारवाई सुरू केली. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तसेच ईडी मार्फत चौकशी सुरू केली. या चौकशीला सामोर न जाता नाईकने मलेशियाला मध्ये पलायन केले. न्यायालयानेही त्याला फरार घोषीत केली. आयएने आरोपपत्र दाखल केले. या विरोधात नाईकच्यावतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर न्यायमूर्ती न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठा समोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने पळकूटा झाकीर न्यायालयात याचिका कशी काय करून शकतो? असा सवाल उपस्थित केला. आम्हाला काहीही ऐकून घ्यायचे नाही. आरोपी तपास यंत्रणेसमोर केव्हा हजर होणार अशी विचारना न्यायालयाने नाईकच्या वकीलाना केली मात्र त्यावर वकीलांना उत्तर देता न असल्याने न्यायालयाने याचिकाच फेटाळून लावली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात!

कोल्हापूर – कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात झाली आहे. तलावात तांबट कमान परिसरात पडलेल्या पूजाअर्चेच्या साहित्यामुळे प्रदुषणामध्ये भर पडत होती. त्यामुळे येथे मासे, कासव मृत...
Read More
post-image
महाराष्ट्र

साताऱ्यात २४ तासांत २७ जण कोरोना पॉझिटिव्ह; तर दोघांचा मृत्यु

सातारा – सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २७जण पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांचा आकडा ३३६ वर पोहचला आहे. तसेच या कालावधीत वाई तालुक्यातील दोन कोरोनाबाधीत...
Read More
post-image
मनोरंजन

ईदनिमित्त भाईजानकडून ५,००० कुटुंबांना अन्नदान

मुंबई – सध्या राज्यात लॉकडाऊन आहे. त्याचा मोठा फटका बहुतांश मजुरांना बसला आहे. अशा संकटाच्या काळात ईदच्या दिवशी कुणीही उपाशी राहू नये. यासाठी अभिनेता...
Read More
post-image
अपघात

कोपरगाव -सिन्नरच्या सीमेवर ट्रकने चेकपोस्टला उडवले

शिर्डी – कोपरगाव -सिन्नर तालुक्यातील सीमेवर पाथरे फाटा येथे लावण्यात आलेल्या चेकपोस्ट जवळच्या तंबूत नाशिकहून भरधाव येणारा ट्रक काल रात्री घुसला आणि कर्तव्यावर असलेले...
Read More
post-image
मुंबई

केईएमच्या शवागृहाची विदारक स्थिती; मृतदेह ठेवायला जागाच नाही!

मुंबई – मुंबईत कोरोनाची स्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच केईएम रुग्णालयातील शवागृह मृतदेहांनी खचाखच भरले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या...
Read More