डॉक्टरांच्या संपामुळे तब्बल ४० हजार शस्त्रक्रिया रद्द – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

डॉक्टरांच्या संपामुळे तब्बल ४० हजार शस्त्रक्रिया रद्द

नवी दिल्ली – पश्‍चिम बंगालमधील संपकरी डॉक्टरांना पाठींबा देण्यासाठी काल देशव्यापी संप पुकारण्यात आला होता. या संपात विविध राज्यांतील डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यामुळे रुग्णांना प्रचंड हाल सहन करावे लागले. देशभरातील रुग्णालयांमध्ये संपामुळे अनेक रुग्णांवरील शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या. केवळ राजधानी दिल्लीत जवळपास चार हजार शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या. येथील ४० रुग्णालयांतील निवासी डॉक्टर संपात सामील होते. तसेच लहान लहान खासगी क्लिनिकही बंद ठेवण्यात आले होते.

दिल्लीच्या सरकारी रुग्णालयांत दररोज कमीत कमी ७० ते ८० हजार लोकांवर उपचार होतात. मात्र संपामुळे हजारो रुग्णांना उपचाराविनाच परतावे लागले. आपत्कालीन कक्षेतदेखील डॉक्टर प्राथमिक उपचारच देत असल्याचे यावेळी रुग्णांनी सांगितले. त्यामुळे भारताच्या इंडियन मेडीकल असोसिएशनने 24 तासांचा देशव्यापी संप केल्याने देशभरातील रुग्णांचे अतोनात हाल झाले.

दरम्यान, पश्‍चिम बंगालमधील संपकरी डॉक्टरांच्याविरोधात राज्यभर रुग्णांचा व जनतेचा संताप वाढू लागल्याने आज डॉक्टरांच्या 24 प्रतिनिधींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी प्रथमच चर्चा केली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी पश्‍चिम बंगालच्या सर्व रुग्णालयात 24 तास पोलीस अधिकारी तैनात ठेवण्याचे व रुग्णांच्या नातेवाईकाच्या संख्येवर अंकुश ठेवण्याची हमी दिली. तसेच डॉक्टरांवर हल्ले करणार्‍यांना कठोर शासन करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर डॉक्टरांनी संप मागे घेतला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

राफेलच्या पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने राफेल कराराबाबत दाखल झालेल्या पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

सबरीमाला मंदिर प्रवेशाचा निर्णय सात न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होणार

नवी दिल्ली – नवी दिल्ली – ऐतिहासिक सबरीमाला प्रकरणावरील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात ३ विरुद्ध २ च्या बहुमताने सात न्यायमूर्तींच्या संविधान पीठाकडे पाठविण्यात आली आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, राजकारण आमच्यासाठी धंदा नाही – संजय राऊत

मुंबई – ‘छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात शब्दाला किंमत आहे. आमची वृत्ती व्यापारी नाही,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

#HappyChildrensDay दारातून डोकावणारी ‘ती’ आज वर्गात बसून शिकतेय

हैदराबाद – असे म्हणतात की, ‘एक फोटो हा हजारो शब्दांसमान असतो.’ अशीच कमाल हैदराबादमधील एका छायाचित्रकाराने टिपलेल्या फोटोने केली आहे. दाराबाहेर उभी राहून वर्गात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

संजय राऊत म्हणतात…’अब हारना और डरना मना है’

मुंबई – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सत्तास्थापनेच्या हालचाली प्रचंड वेगाने सुरू आहेत. शिवसेनेकडून ‘पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच’, अशी घोषणा...
Read More