डॉक्टरांचा देशव्यापी संप! सर्वच राज्यांत रुग्णांचे हाल – eNavakal
आघाडीच्या बातम्या आरोग्य देश

डॉक्टरांचा देशव्यापी संप! सर्वच राज्यांत रुग्णांचे हाल

कोलकाता – कोलकाता येथे रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ व बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निषेधार्थ सुरू झालेला निवासी डॉक्टरांचा संप आता देशभर पसरला आहे. त्याचा फटका मुंबई, दिल्‍ली, बंगळुरू, हैदराबाद, जयपूर, भोपाळ, तिरुवनंतपुरम शहरांतील लाखो रुग्णांना बसला आहे. तर देशातील सर्व डॉक्टरांच्या रोषाला ममता बॅनर्जींना पात्र व्हावे लागले आहे. आधी पश्‍चिम बंगालमधील जनता व आता देशभरातील डॉक्टरांना ममतांच्या विरोधात उभे करण्यात भाजपाला यश आले आहे.

कोलकाता येथे मारहाण झालेल्या डॉक्टरला पाठिंबा देण्यासाठी कोलकाता शहरातील निवासी व शिकाऊ डॉक्टर संपावर गेले. मारहाणीच्या विरोधात आंदोलन करणार्‍या डॉक्टरांनाही तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारले. त्यामुळे डॉक्टरांच्या संपाचे लोण देशभर पसरले. डॉक्टरांना सुरक्षित वातावरण द्या व हल्‍लेखोरांना पकडा. या मागणीसाठी बंगाल, दिल्‍ली, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ, कर्नाटक व तेलंगणातील डॉक्टर संप करीत आहेत. दिल्‍लीतील अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थानसह मुंबईच्या ‘मार्ड’च्या नेतृत्वाखाली हा संप सुरू आहे. तर ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने त्यांच्या सर्व राज्यांतील सदस्यांना निदर्शने करण्याचे आदेश दिले आहेत.

त्याचा परिणाम म्हणून या विविध शहरांतील रुग्णालयामधील ओपीडी विभाग, एक्स-रे विभाग, डायलिसीस विभाग, रक्‍त-लघवी चाचणी विभागांसहित अनेक विभाग बंद आहेत. फक्‍त अत्यावश्यक शस्त्रक्रियाच केल्या जाणार आहेत. मात्र मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांचे डायलिसीस होत नाहीत. त्यामुळे गरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स १३०० अंकांनी वधारला

मुंबई – मोदी सरकारकडून शुक्रवारी कंपनी करात करण्यात आलेल्या कपातीनंतर आज शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने जवळपास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

अनुष्का शर्माचा देशातील सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत समावेश

नवी दिल्ली – मिसेस कोहली अर्थात बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला भारतातील सामर्थ्यशाली स्री म्हणून घोषित करण्यात आले आहे. फॉर्च्यून इंडियाने भारतातील ५० सामर्थ्यवान...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – द्रूतगतीवरची कासवगती

केंद्रीय वाणिज्य आणि रेल्वे मंत्री यांना मुंबईतल्या वाहतूक कोंडीचा फटका बसला आणि त्यांनी मुंबईकर कसे संयमी आहेत, असा पलटवार करून वेळ मारून नेली. परंतु...
Read More
post-image
मुंबई

घाटकोपरमध्ये कोचिंग क्लास चालकाची भर वर्गात हत्या

मुंबई – घाटकोपर येथे कोचिंग क्लास चालकाची भर वर्गात हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान घाटकोपर येथे मयांक ट्युटोरियल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

अमित शहा २६ सप्टेंबरला पुन्हा मुंबईत

मुंबई – महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असणार असल्याची घोषणा करत भाजपा राष्ट्राध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी मुंबईतील गोरेगाव येथील सभेत विधानसभेच्या प्रचाराचा...
Read More